ममता बॅनर्जींना मोठा धक्का: बंडखोर नेते ऋतब्रता बॅनर्जी झाले विरोधी पक्षनेते!

SHARE:

पश्चिम बंगाल – विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर टीएमसी सुप्रिमो ममता बॅनर्जी यांच्या पक्षाची अवस्था ही महाराष्ट्रातील शिवेसेना आणि राष्ट्रवादी सारखी झाली आहे. निवडणुकीनंतर एकाच महिन्यात टीएमसीत फुट पडली आहे. टीएमसीतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलेले बंडखोर नेते ऋतब्रता बॅनर्जी यांना विधानसभा अध्यक्ष रतीन बोस यांनी बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून अधिकृतपणे मान्यता दिली आहे. यामुळे टीएमसी सुप्रीमो ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का लागला आहे.

बुधवारी तृणमूल काँग्रेसला (टीएमसी) आपल्या 28 वर्षांच्या इतिहासात पहिल्यादाच फुटीचा सामना करावा लागला. 58 बंडखोर आमदारांनी पक्षातून निष्काशीत केलेले नेते ऋतब्रता बॅनर्जी यांची विरोधी पक्षनेते म्हणून निवड केली. यानंतर त्यांनी पक्षाच्या विधिमंडळातील नेतेपदावर नियंत्रण मिळवले आणि विधानसभेच्या अध्यक्षांकडून मान्यता मिळवली.
ऋतब्रता बॅनर्जी आणि त्यांचे सहकारी, पक्षातून काढून टाकलेले आमदार संदीपान साहा यांच्या नेतृत्वाखालील बंडखोर गटाने अध्यक्ष रथींद्र बोस यांना 58 आमदारांची पाठिंब्याची यादी सादर केली. पक्षांतरबंदी कायद्यानुसार स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळवण्यासाठी आवश्यक असलेले दोन-तृतीयांश बहुमत त्यांनी सहज पार केले.

अध्यक्षांची भेट घेतल्यानंतर ऋतब्रता बॅनर्जी यांनी पत्रकारांना सांगितले, अध्यक्षांनी आमची मागणी मान्य केली आहे. संख्याबळाच्या आधारावर वैधतेचा दावा करत, त्यांनी ठामपणे सांगितले की बंडखोर आमदार आता विधानसभेतील खऱ्या तृणमूल काँग्रेसचे प्रतिनिधित्व करतात. टीएमसी विधिमंडळ पक्ष हा टीएमसीच्या चिन्हावर निवडणूक जिंकलेल्या 58 आमदारांचा संघ आहे. विधानसभेतील खरा टीएमसी पक्ष आमचाच आहे.

विधानसभा अध्यक्षांच्या या निर्णयामुळे, 1998 मध्ये ममता बॅनर्जी यांनी स्थापन केलेल्या टीएमसी पक्षाच्या फुटीला मान्यता मिळाली आहे. बंडखोर गटाने ऋतब्रता बॅनर्जी यांना विरोधी पक्षनेते आणि अख्रुझमान यांना मुख्य प्रतोद म्हणून नियुक्त केले.

ऋतब्रता बॅनर्जी म्हणाले की अभिषेक बॅनर्जी यांचा विधानसभेत पक्षाशी काहीही संबंध नाही. त्यांची कोणतीही भूमिका असणार नाही. बंगालच्या जनतेचा अभिषेक बॅनर्जी यांच्याशी काहीही संबंध नाही. जर असता, तर ते 26 दिवस लपून राहिले नसते. आम्ही राज्य सरकार किंवा केंद्र सरकार यांपैकी कोणाकडेही सुरक्षेची मागणी करणार नाही.

त्यांनी सांगितले की अभिषेक बॅनर्जी यांनी खासदार म्हणून बनावट कागदपत्रांचा वापर करून पत्र पाठवले. हा सभापतींचा विशेषाधिकार आहे. ते काय करतील हे अज्ञात आहे… जर असे काही घडले असेल आणि ते सिद्ध झाले, तर विधानसभा अध्यक्ष अभिषेक बॅनर्जी यांची खासदारकी रद्द करण्यासाठी पत्र लिहू शकतात. दरम्यान टीएमसीची अवस्था ही महराष्ट्रातील शिवसेना आणि राष्ट्रवादीसारखी होत असल्याचे दिसत आहे.

विवेक गंगाधरराव राऊत
Author: विवेक गंगाधरराव राऊत

Cheif Editor, Rayat Rakshak News, Maharashtra.

Leave a Comment