जिल्हा परिषद नागपूर येथे लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन…

SHARE:

नागपूर – दि. १३ ऑक्टोबर २०२६ रोजी जिल्हा परिषद नागपूर अंतर्गत ‘सेवा संकल्प अभियान २०२६’ च्या अनुषंगाने लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कर्मचाऱ्यांची प्रशासकीय कार्यक्षमता वाढविणे, कार्यालयीन कामकाज अधिक गतिमान करणे तसेच शासकीय सेवांचा दर्जा उंचावणे हा या प्रशिक्षणाचा प्रमुख उद्देश आहे.

या प्रशिक्षण कार्यक्रमास आदरणीय श्री. महामुनी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नागपूर, तसेच डॉ. फुटाणे सर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, श्रीमती गराटे मॅडम उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच प्रशिक्षणकरिता वनमाती येथील प्रवीण प्रशिक्षक म्हणून श्री. गोसावडे श्री. किरीट देशपांडे, श्री. भालेराव, श्री. प्रदीप देशपांडे हे उपस्थित होते.

प्रशिक्षणादरम्यान शासकीय कामकाजातील नियम व कार्यपद्धती, कार्यालयीन अभिलेखांचे व्यवस्थापन, प्रशासकीय कामकाजातील अचूकता, कार्यक्षमता आणि नागरिकांना वेळेत सेवा उपलब्ध करून देण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. कर्मचाऱ्यांनी आपल्या दैनंदिन कामकाजात प्रशिक्षणातून मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग करून कामकाज अधिक पारदर्शक, गतिमान व परिणामकारक करावे, असे मार्गदर्शन करण्यात आले.

‘सेवा संकल्प अभियान २०२६’ अंतर्गत आयोजित हा प्रशिक्षण उपक्रम कर्मचाऱ्यांच्या क्षमता विकासासाठी तसेच जिल्हा परिषद प्रशासन अधिक सक्षम व लोकाभिमुख करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरत आहे.

विवेक गंगाधरराव राऊत
Author: विवेक गंगाधरराव राऊत

लेखक सा. रयत रक्षक व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र. चे मुख्य संपादक असून स्वतः प्रकाशक व मालक आहेत. त्यांना मागील 20 वर्षांपासून सामाजिक व राजकीय क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव व पत्रकारिता क्षेत्रातील मागील 9 वर्षाचा अनुभव आहे. आपल्या लेखणीतून ते नेहमी रयतेचे हित जोपसण्याचे कार्य करतात.

Leave a Comment

अधिक वाचा