विधानपरिषद निवडणूक निकाल : ५ पैकी महायुती २ तर महाविकास आघाडी ३ जागांवर विजयी; नागपूर पदवीधर मतदारसंघातून काँग्रेसचे अभिजित वंजारी विजयी!

SHARE:

नागपूर : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या ३ पदवीधर २ आणि शिक्षक अशा एकूण ५ मतदारसंघांसाठी पार पडलेल्या निवडणुकीचे निकाल आता स्पष्ट होत आहेत. महायुती आणि महाविकास आघाडी (मवीआ) या दोन्ही बाजूंसाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात होती. या निवडणुकीत एकूण १८२ उमेदवार रिंगणात असून, मतदानादिवशी जोरदार उत्साह पाहायला मिळाला होता.

निवडणुकीची महत्त्वाची आकडेवारी एका नजरेत :

एकूण जागा : ५ (३ पदवीधर आणि २ शिक्षक मतदारसंघ)
एकूण उमेदवार : १८२
एकूण मतदार : १०,६८,०७२
सरासरी मतदान : ७२.९६ टक्के

मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी :

या निवडणुकीत शिक्षकांमध्ये मतदानाबाबत मोठा उत्साह दिसून आला, तर पदवीधर मतदारसंघांमध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला

अमरावती शिक्षक मतदारसंघ : ९२.२५% (सर्वाधिक मतदान)
पुणे शिक्षक मतदारसंघ : ८५.८६%
नागपूर पदवीधर मतदारसंघ : ६४.८२%
पुणे पदवीधर मतदारसंघ : ६२.७६%
छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघ : ५९.१२% (सर्वात कमी मतदान)

मतमोजणी आणि निकालांचे कल :

नागपूर पदवीधर मतदारसंघ या जागेवर काँग्रेसचे उमेदवार अभिजित वंजारी यांनी अत्यंत चूर्षीच्या लढाई मधे विजय मिळवला आहे. त्यांनी ३,२७१ मतांची आघाडी मिळवत भाजपा चे सुधाकर कोहळे यांचा पराभव केला. दुसऱ्या पसंतीच्या फेरीत अपक्ष उमेदवार नितेश कराळे यांची मते निर्णायक ठरली.

इतर जागांची स्थिती : पुणे शिक्षक व पदवीधर, अमरावती शिक्षक आणि छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) पदवीधर मतदारसंघांमध्ये विजयासाठी आवश्यक असलेला कोटा (Quota) प्रथम पसंतीच्या मतांमध्ये पूर्ण न झाल्याने दुसऱ्या पसंतीक्रमाच्या (Second Preference) मतांची मोजणी करण्यात आली. पुणे आणि मराठवाड्यात अटीतटीची लढत पाहायला मिळाली असून, अनेक ठिकाणी मतमोजणीचे चित्र अत्यंत चुरशीचे ठरले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था व शिक्षक-पदवीधर मतदारसंघांच्या या निकालांमुळे आगामी राजकीय समीकरणांवर मोठा प्रभाव पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यात विधानपरिषदेच्या या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी ला मतदारांनी प्रथम पसंती दर्शवली आहे..

विवेक गंगाधरराव राऊत
Author: विवेक गंगाधरराव राऊत

लेखक सा. रयत रक्षक व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र. चे मुख्य संपादक असून स्वतः प्रकाशक व मालक आहेत. त्यांना मागील 20 वर्षांपासून सामाजिक व राजकीय क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव व पत्रकारिता क्षेत्रातील मागील 9 वर्षाचा अनुभव आहे. आपल्या लेखणीतून ते नेहमी रयतेचे हित जोपसण्याचे कार्य करतात.

Leave a Comment

अधिक वाचा