दि. १ नोव्हेंबर २०२६ ला असलेल्या राष्ट्रीय लेखक दिनानिमित्त साहित्यिक व अभंगकार प्रा. अरुण बाबारावजी बुंदेले यांचा अभंग वाचकांसाठी येथे प्रकाशित करीत आहोत.
राष्ट्रीय लेखक दिन
एक नोव्हेंबर । राष्ट्रीय लेखक ।
दिन असे खास । लेखकांचा ॥
अन्याय शोषण । वर्ण जाती भेद ।
ग्रंथातून छेद । लेखकाच्या ॥
तत्वज्ञ लेखक । चिंतन प्रतीक ।
वंचित दर्शक । आत्मभान ॥
शब्दशिल्पिच्या या । तेज लेखनीला ।
सत्य चिंतनाला । सलाम हा ॥
साहित्यात असे । सामाजिक जाण ।
समाजात मान । लेखकाला ॥
लेखनीला असे । धार वैचारिक ।
अन् सांस्कृतिक । लेखकाच्या ॥
समाजाची मूल्ये । समता विचार ।
जीवनाचा सार । शब्दातून ॥
परिवर्तनाचे । एक शिल्पकार ।
तेच कथाकार । ग्रंथकार ॥
एक नोव्हेंबर । लेखकाच्या दिनी ।
प्रणाम करांनी । लेखकांना ॥
लेखक –
प्रा. अरुण बाबारावजी बुंदेले,
संत कबीर कविराज पुरस्कार प्राप्त
अभंगकार, अमरावती.
संपर्क :८०८७७४८६०९
Author: प्रा. अरुण बाबारावजी बुंदेले
लेखक एक उत्कृष्ट शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी मार्गदर्शक, साहित्यिक, कवी, अभंगकार, समीक्षक, समाजप्रबोधनकर्ते असून अमरावती शहरातील प्रतिष्ठित नागरिक आहेत. सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक विषयावरील बारा पुस्तकांचे लेखक असून बावीस पुरस्कारांचे मानकरी आहेत. सोबतच विविध पुरोगामी सामाजिक संघटनेच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात अग्रेसर आहेत. मागील गेल्या दोन वर्षांपासून ते सा. रयत रक्षक, महाराष्ट्र व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र च्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक अशा विविध विषयांवर लिखाण करून आपले विचार ते जनतेपुढे मांडत असतात.






