सातारा – राज्यातील भाजपा सरकारकडे विकासासाठी पैसे नाही, तर कमिशनसाठी शक्तीपीठ मार्ग बांधण्याचा डाव आहे ,असे राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. भारताच्या राजकारणात मोठी उलथापालथ होत आहे. अमेरिका लैंगिक शोषण प्रकरणाबाबत पृथ्वीराज चव्हाणांनी मोठे वक्व्य केले आहे. अमेरिकेत बालके आणि युवक शोषणाला खूप गांभीर्याने घेतलं जाते, म्हणून असे कायदे होतात, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.
लोकसभा निवडणुकीत चांगले यश मिळाल्यामुळे विधानसभा निवडणुकीत आमच्या पक्षात थोडा जास्त आत्मविश्वास आला. काही लोक तर मीच मुख्यमंत्री होणार असे म्हणू लागले होते. परिणामी आम्हाला धक्का बसला आणि निकाल आमच्या विरोधात लागला, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे. यात त्यांनी निवडणूक आयोगावरदेखील टीका केली आहे. यात निवडणूक आयोगाच्या चुका सुद्धा आहेत. ते दुहेरी नावे का काढत नाहीत? असा प्रश्न त्यांनी राज्यातील भाजपा सरकारला व निवडणुक आयोगाला विचारला आहे.
माझ्या कराड मतदारसंघातच ५० ते ६० हजार मतदारांची नावे मतदार यादीत दोनदा आली आहेत. इतकेच नव्हे, तर माझ्या मतदारसंघातील १२ हजार मतदारांची नावे चक्क ४८ ठिकाणी दिसत आहे. यामुळे लोक अनेक ठिकाणी मतदान करतात. मला मागच्या वेळेपेक्षा जास्त मते मिळाली तरी मी हरलो. लाडकी बहीण असल्यामुळे निकाल बदलले असे आम्हाला वाटत नाही, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्रात रोज शेतकरी आत्महत्या करत आहेत, तरी सत्ताधारी एक ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था असल्याचा दावा करत आहे. याची राज्यातील भाजपा सरकारला लाज वाटायला हवी आहे. एका मराठी माणसाला पंतप्रधानपद मिळेल असे मी बोललो होतो आणि त्यावर स्पष्टीकरणही दिले आहे. १९ डिसेंबर २०२५ पर्यंत थांबा, राज्यात काय घडते ते पाहू, असे ते म्हणाले आहेत.
१९९९ मध्ये वाजपेयी सरकारने केलेली अणुचाचणी ही मोठी चूक होती. त्यामुळे पाकिस्ताननेही चाचणी करून स्वतःला अणुशक्ती असलेला देश म्हणून घोषित केले. आणि तो आपल्या बरोबरीला आल्याचे ते म्हणाले. मोदी देशातील भाजपा सरकारने सेमीकंडक्टर उद्योगाच्या नावाखाली पुन्हा लायसन्स राज आणले आहे. महाराष्ट्रात मोठे उद्योग का येत नाहीत? असा प्रश्न त्यांनी राज्यातील भाजपा सरकारसमोर उपस्थित केला आहे. राज्यातील भाजपा सरकारकडे विकासकामांसाठी पैसे नाहीत, फक्त कमिशनसाठी राज्यातील शक्तीपीठ मार्ग बांधण्याचा डाव आहे ,असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.
अमेरिकेत जेफ्री एपस्टीन नावाचा उद्योगपती लैंगिक शोषण आणि ट्रॅफिकिंग करत असल्याचे उघड झाले आहे. न्यायालयाने त्याला शिक्षा दिली, पण ट्रम्पचा जवळचा असल्यामुळे त्याचे गुन्हे लपवले जातील असे अमेरिकन लोकांना वाटत होते. त्याचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. त्यामूळे अमेरिकेत एपस्टीन फाइल्स पारदर्शकता कायदा पास झाला आहे. या कायद्याने त्याच्या गुन्ह्यांची माहिती जगजाहीर होणार आहे. १९ डिसेंबर २०२५ रोजी मोठी नावे उघड होऊ शकतात, ज्यात काही मोठी भारतीय नावेही आहेत, असे ते म्हणाले. मी आज नाव घेणार नाही, पण यादीत देशातील ३ माजी खासदार आहेत. यामुळे भारताच्या राजकारणात मोठी उलथापालथ होऊ शकते, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. भारत-पाकिस्तान युद्धबंदीच्या वेळी ट्रम्पची मध्यस्थी मोदींना मान्य करावी लागली याचा १९ डिसेंबर २०२५ शी संबंध असू शकतो.
अमेरिकेत बालके आणि युवक शोषणाला खूप गांभीर्याने घेतले जाते, म्हणून अमेरिकेत कडक कायदे तयार होतात, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. देशात व राज्यात सध्या भाजपा सरकारच्या काळात अस्थिर परिस्थिती आहे. राज्यात सगळीकडे अंदाधंद कारभार चालला आहे, राज्यात विकासाच्या नावाखाली कमिशन गोळा करणारी टोळी उदयास येत आहे. विकासाच्या व धर्माच्या नावाखाली कमिशन खायला मिळेल या आशेने या राज्यात सध्याचे भाजपा सरकार नवीन प्रकल्प आणत आहेत, विकाससाठी यांच्या भाजपा सरकारकडे पैसे नाहीत ,तर राज्यातील नवीन शक्तीपीठ मार्ग बांधुन त्याच्यात कमिशन खाण्याचा डाव या भाजपा सरकारचा आहे, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.राज्यातील भाजपा सरकारकडे विकासासाठी पैसे नाही, तर कमिशनसाठी शक्तीपीठ मार्ग बांधण्याचा डाव आहे ,असे राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. भारताच्या राजकारणात मोठी उलथापालथ होत आहे. अमेरिका लैंगिक शोषण प्रकरणाबाबत पृथ्वीराज चव्हाणांनी मोठे वक्व्य केले आहे. अमेरिकेत बालके आणि युवक शोषणाला खूप गांभीर्याने घेतलं जाते, म्हणून असे कायदे होतात, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.
लोकसभा निवडणुकीत चांगले यश मिळाल्यामुळे विधानसभा निवडणुकीत आमच्या पक्षात थोडा जास्त आत्मविश्वास आला. काही लोक तर मीच मुख्यमंत्री होणार असे म्हणू लागले होते. परिणामी आम्हाला धक्का बसला आणि निकाल आमच्या विरोधात लागला, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे. यात त्यांनी निवडणूक आयोगावरदेखील टीका केली आहे. यात निवडणूक आयोगाच्या चुका सुद्धा आहेत. ते दुहेरी नावे का काढत नाहीत? असा प्रश्न त्यांनी राज्यातील भाजपा सरकारला व निवडणुक आयोगाला विचारला आहे.
माझ्या कराड मतदारसंघातच ५० ते ६० हजार मतदारांची नावे मतदार यादीत दोनदा आली आहेत. इतकेच नव्हे, तर माझ्या मतदारसंघातील १२ हजार मतदारांची नावे चक्क ४८ ठिकाणी दिसत आहे. यामुळे लोक अनेक ठिकाणी मतदान करतात. मला मागच्या वेळेपेक्षा जास्त मते मिळाली तरी मी हरलो. लाडकी बहीण असल्यामुळे निकाल बदलले असे आम्हाला वाटत नाही, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्रात रोज शेतकरी आत्महत्या करत आहेत, तरी सत्ताधारी एक ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था असल्याचा दावा करत आहे. याची राज्यातील भाजपा सरकारला लाज वाटायला हवी आहे. एका मराठी माणसाला पंतप्रधानपद मिळेल असे मी बोललो होतो आणि त्यावर स्पष्टीकरणही दिले आहे. १९ डिसेंबर २०२५ पर्यंत थांबा, राज्यात काय घडते ते पाहू, असे ते म्हणाले आहेत.
१९९९ मध्ये वाजपेयी सरकारने केलेली अणुचाचणी ही मोठी चूक होती. त्यामुळे पाकिस्ताननेही चाचणी करून स्वतःला अणुशक्ती असलेला देश म्हणून घोषित केले. आणि तो आपल्या बरोबरीला आल्याचे ते म्हणाले. मोदी देशातील भाजपा सरकारने सेमीकंडक्टर उद्योगाच्या नावाखाली पुन्हा लायसन्स राज आणले आहे. महाराष्ट्रात मोठे उद्योग का येत नाहीत? असा प्रश्न त्यांनी राज्यातील भाजपा सरकारसमोर उपस्थित केला आहे. राज्यातील भाजपा सरकारकडे विकासकामांसाठी पैसे नाहीत, फक्त कमिशनसाठी राज्यातील शक्तीपीठ मार्ग बांधण्याचा डाव आहे ,असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.
अमेरिकेत जेफ्री एपस्टीन नावाचा उद्योगपती लैंगिक शोषण आणि ट्रॅफिकिंग करत असल्याचे उघड झाले आहे. न्यायालयाने त्याला शिक्षा दिली, पण ट्रम्पचा जवळचा असल्यामुळे त्याचे गुन्हे लपवले जातील असे अमेरिकन लोकांना वाटत होते. त्याचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. त्यामूळे अमेरिकेत एपस्टीन फाइल्स पारदर्शकता कायदा पास झाला आहे. या कायद्याने त्याच्या गुन्ह्यांची माहिती जगजाहीर होणार आहे. १९ डिसेंबर २०२५ रोजी मोठी नावे उघड होऊ शकतात, ज्यात काही मोठी भारतीय नावेही आहेत, असे ते म्हणाले. मी आज नाव घेणार नाही, पण यादीत देशातील ३ माजी खासदार आहेत. यामुळे भारताच्या राजकारणात मोठी उलथापालथ होऊ शकते, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. भारत-पाकिस्तान युद्धबंदीच्या वेळी ट्रम्पची मध्यस्थी मोदींना मान्य करावी लागली याचा १९ डिसेंबर २०२५ शी संबंध असू शकतो.
अमेरिकेत बालके आणि युवक शोषणाला खूप गांभीर्याने घेतले जाते, म्हणून अमेरिकेत कडक कायदे तयार होतात, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. देशात व राज्यात सध्या भाजपा सरकारच्या काळात अस्थिर परिस्थिती आहे. राज्यात सगळीकडे अंदाधंद कारभार चालला आहे, राज्यात विकासाच्या नावाखाली कमिशन गोळा करणारी टोळी उदयास येत आहे. विकासाच्या व धर्माच्या नावाखाली कमिशन खायला मिळेल या आशेने या राज्यात सध्याचे भाजपा सरकार नवीन प्रकल्प आणत आहेत, विकाससाठी यांच्या भाजपा सरकारकडे पैसे नाहीत ,तर राज्यातील नवीन शक्तीपीठ मार्ग बांधुन त्याच्यात कमिशन खाण्याचा डाव या भाजपा सरकारचा आहे, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.