पुण्यात आयटी, इंजिनियरची ऑफिसमध्ये आत्महत्या…

SHARE:

पुणे – पुण्यात आयटी, इंजिनियरने ऑफिसमध्ये आत्महत्या केली आहे. मोबाईल चार्जरच्या केबलचा वापर करून आयटी, इंजिनियरने गळफास घेतला आहे. बराच वेळ झाला तरी तो बाहेर आला नाही, त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. पुण्यात २४ वर्षीय आयटी इंजिनिअरने ऑफिसमध्येच जीवन संपविले आहे. मोबाईलच्या चार्जरने फास घेतला आहे.

पुणे शहरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे, ऑनलाइन जुगार खेळण्याच्या व्यसनामुळे , एका तरुण आयटी अभियंत्याने टोकाचे पाऊल उचलत आपले, जीवन संपवल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. हिंजवडी आयटी पार्कमधील एका सॉफ्टवेअर कंपनीत कार्यरत असलेल्या, सुजल विनोद ओसवाल वय २४, रा. वानवडी या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

सुजल ओसवाल हा हिंजवडीमधील एका नामांकित खासगी कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करत होता. कामावर असताना तो कंपनीच्या कॅन्टीनमधील स्वच्छतागृहामध्ये गेला. तिथे त्याने मोबाईल चार्जरच्या केबलचा वापर करून गळफास घेतला. बराच वेळ झाला तरी तो बाहेर आला नाही, त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. ही घटना मंगळवारी पहाटे उघडकीस आली. कंपनीच्या कॅन्टीनच्या स्वच्छतागृहात मोबाइल चार्जरच्या केबलच्या साहाय्याने त्याने गळफास घेत आत्महत्या केली आहे.

हे कठोर पाऊल उचलण्यापूर्वी सुजलने आपल्या नातेवाईकांच्या मोबाईलवर एक मेसेज पाठवला होता. या मेसेजमध्ये त्याने ऑनलाइन सट्टा आणि बेटिंगच्या आहारी गेल्याचे कबूल केले होते. ऑनलाइन जुगारात मोठ्या प्रमाणावर पैसे हरल्यामुळे त्याच्यावर कर्ज झाले होते. या आर्थिक दबावामूळे नैराश्यातून टोकाचे पाऊल उचलले आहे, असे पोलिसांनी सांगितले आहे. उच्चशिक्षित आणि चांगल्या पगाराची नोकरी करत असतानाही, केवळ जुगाराच्या व्यसनामुळे पुण्यातील एका २४ वर्षीय तरुणाचा, असा मृत्यु झाल्याने, आयटी क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस करत आहेत.

Leave a Comment

अधिक वाचा