नाताळच्या सजावटीची तोडफोड करणाऱ्या बजरंग दलाच्या सदस्यांना मिळाला जामीन, हार घालून केले स्वागत…

SHARE:

रायपूर – छत्तीसगडची राजधानी रायपूर येथील मॅग्नेटो मॉलमध्ये नाताळच्या सजावटीची तोडफोड करणार्या बजरंग दलाच्या सहा सदस्यांना बुधवारी सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला. गुरुवारी रायपूर मध्यवर्ती कारागृहातून आरोपी बाहेर पडल्यावर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे फुले देऊन स्वागत केले आणि ईसाई मिशनरी मुर्दाबाद अशा घोषणा दिल्या. इतकेच नाही कार्यकर्त्यांनी आरोपींना खांद्यावर घेऊन शहरातून मिरवणूक काढली आणि त्यांच्या सुटकेचा आनंद साजरा केला. उल्लेखनीय म्हणजे यापूर्वी २९ डिसेंबर रोजी रायपूरमधील एका दंडाधिकारी न्यायालयाने या आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला होता.

२४ डिसेंबर रोजी, छत्तीसगडमध्ये कथित धर्मांतराच्या निषेधार्थ उजव्या विचारसरणीच्या संघटनांनी पुकारलेल्या बंद दरम्यान, काठ्यांनी सशस्त्र जमाव रायपूरच्या लोकप्रिय मॅग्नेटो मॉलमध्ये घुसला. जमावाने सांताक्लॉज, रेनडियर, स्लेज आणि स्नोमेन सारख्या ख्रिसमसच्या सजावटी वस्तूंची तोडफोड केली. मॉलच्या सुरक्षा रक्षकांनी जमावाला रोखण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना नियंत्रणात आणता आले नाही.
त्यानंतर, तेलीबांधा पोलिस ठाण्यात आयपीसीच्या कलम ३३१(३), ३२४(२), ११५(२), १९१(२) आणि १९० अंतर्गत ३० ते ४० अज्ञात व्यक्तींविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला. या प्रकरणी तेलीबांधा पोलिसांनी २७  डिसेंबर रोजी सहा जणांना अटक करून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. यांनतर सहा आरोपी पाच दिवस तुरुंगात राहिले. या अटकेच्या निषेधार्थ ३०० बजरंग दलाचे कार्यकर्त्यांनी तेलीबांधा पोलिस ठाण्याबाहेर मुख्य रस्त्यावर बसून सुमारे नऊ तास वाहतूक रोखून धरली. या घटनेसंदर्भात कोणताही एफआयआर नोंदवण्यात आलेला नाही.

बजरंग दलाचे राज्य संयोजक ऋषी मिश्रा यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितले की ईसाई मिशनीरीच्या विरोधात घोषणा देण्यात काय गैर आहे? हा संपूर्ण मुद्दा छत्तीसगडमध्ये ते करत असलेल्या धार्मिक धर्मांतराशी संबंधित आहे. सर्व ब्राह्मणवादी संघटनांनी बंद पुकारण्याचा निर्णय घेतला होता, परंतु एका कटाचा भाग म्हणून आमच्या कार्यकर्त्यांना तुरुंगात पाठवण्यात आले. म्हणून, या मुद्द्यावर घोषणाबाजी केली जाईल. ते म्हणाले कि आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांवर गर्व आहे. यानंतर कांग्रेससह कार्यकर्त्यांनी या घटनेवरून राज्य आणि केंद्र सरकार धारेवर धरले.

माहित असावे कि ब्राह्मणवादी संघटनांच्या कार्यकर्त्यांना संगिण गुन्हयांत जामीन मिळणे आणि त्यांचे पुष्पमालेने स्वागत करणे ही नवीन गोष्ट नाही. यापूर्वी गुजरातमध्ये बिल्किस बानो यांच्यावर बलात्कार करणार्या संघी गुडांना सोडण्यात आले होते. यानंतर त्यांचे पुष्पमालेने आणि आरती उतारून स्वागत करण्यात आले होते. हाच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा नवीन भारत, रामराज्य आणि भाजपचा नवा मॉडेल आहे. असे म्हटले तर वावगे ठरू नये.

Leave a Comment

अधिक वाचा