धाराशिव – राज्यातील महापालिका निवडणुकांत, प्रतिस्पर्धी उमेदवाराला आर्थिक अमिष दाखविण्याचे प्रकार घडत आहेत, आणि राज्यात कोट्यावधी रुपयांचा चुराडा भाजपा सरकार करत आहेत, असा खासदार राजू शेट्टींनी भाजपा सरकार गंभीर आरोप केला आहे. राज्यात मराठी माणसाच्या भल्यासाठी मुंबईत ठाकरेच हवे आहेत. आता राज्यात आणखी एक नेता ठाकरे बंधूंच्या पाठीशी उभा राहिला आहे. राज्यातील मराठी माणसाच्या भल्यासाठीचे, मुंबईतील महाराष्ट्राच्या हक्काचे किती प्रकल्प गुजरातला पाठवले याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून घ्या, म्हणजे मुख्यमंत्र्यांचे मराठीवर किती प्रेम आहे हे राज्यातील व मुंबईतील जनतेला समजेल असे, माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले आहेत.
मुंबई महापालिका निवडणूक मराठी माणूस विरोधात हिंदी भाषिक यानिवडणुका होत असताना आता आणखी एका राज्यातील नेत्याने ठाकरे बंधूंना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. मराठी माणसाच्या भल्यासाठी मुंबईत ठाकरेच विजयी व्हावेत, आमची त्यांना सहानुभूती आहे असे शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी म्हणाले आहेत. महाराष्ट्राच्या हक्काचे किती प्रकल्प मूख्यमंत्री फडणवीय यांनी गुजरातला पाठवले आहे याची माहिती घ्यावी. राज्यातील शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा या मागणीसाठी धाराशिवमध्ये झालेल्या आंदोलनानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
राज्यात महापालिकेच्या निवडणुकीत राज्यात इतर ठिकाणी काँग्रेसला पाठिंबा देणाऱ्या राजू शेट्टी यांनी, मुंबईत मात्र ठाकरे बंधूंना पाठिंबा जाहीर केला आहे. आमचे वैचारिक मतभेद असले तरीही, मुंबईत मराठी माणसाच्या भल्यासाठी ठाकरे बंधूच विजयी व्हावेत असे राजू शेट्टी म्हणाले आहेत. राज्यातील मुख्यमंत्र्यांवर मोठा आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे. मुंबईवर, मराठी माणसावर प्रेम आहे, त्यांच्या विकासासाठी आपण प्रयत्न करतो आहे, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला आहे, त्यावर प्रतिक्रिया देताना राजू शेट्टी यांनी भाजपा सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्राच्या हक्काचे प्रकल्प गुजरातला किती पाठवले त्याची माहिती घ्या, म्हणजे त्यावरून मराठीवर मुख्यमंत्र्यांचे प्रेम दिसून येईल असं राजू शेट्टी म्हणाले आहेत.
माजी खासदार राजू शेट्टी यांनी शक्तिपीठ महामार्गाला विरोध दर्शवण्यासाठी, धाराशिव सोलापूर सीमावर्ती भागात शेतकऱी बांधवांचे मोठे अधिवेशन घेतले. त्यामध्ये त्यांनी राज्यातील भाजपा सरकारच्या धोरणांवर टीका केली आहे. हिंगोलीत शक्तिपीठाविरोधात मोर्चा काडण्यात आला होता. राज्यातील शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी हिंगोलीत शेतकऱी बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठा मोर्चा काढला. शक्तिपीठ महामार्ग हिंगोलीच्या वसमत आणि कळमनुरी तालुक्यातून जात असल्याने या महामार्गासाठी शेतकरी बांधवांची शेकडो एकर सुपीक जमीन हस्तांतरित केली जाणार आहे. बाधीत शेतकऱी बांधवांवर उपासमारीची वेळ येईल असा दावा करत शेतकऱी बांधवांनी हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली आहेत. यावेळी शेतकऱी बांधवांनी रक्ताने लिहिलेले पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.





