७० हजार कोटींचा घोटाळा लपवण्यासाठीच अजित पवार भाजपासोबत आले, महेश लांडगेंचे टीकास्त्र…

SHARE:

पिंपरी – महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पिंपरी-चिंचवडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजप आमदार महेश लांडगे यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असून यात आता वाढ झाली आहे. पिंपरी-चिंचवडमधील भ्रष्टाचाराच्या आकाला संपवायचं आहे, असे वक्तव्य अजित पवारांनी केल्यानंतर, भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी पटलवार केला आहे. ७० हजार कोटी रुपयांचा सिंचन घोटाळा लपविण्यासाठी अजित पवार हे भाजपात आले. अशी टीका आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या प्रचारात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या 9 वर्षांतील भाजपाच्या सत्ताकाळात गुंडगिरी, दादागिरी व दहशत माजवून महापालिका अक्षरशः लुटून खाल्ली. असा आरोप भाजपाचे आमदार महेश लांडगे यांचे नाव न घेता केला. या आरोपांवर पलटवार करताना आमदार महेश लांडगे यांनी अजित हेच पिंपरी चिंचवडचे आका आहेत, ७० हजार कोटी रुपयांचा सिंचन घोटाळा लपविण्यासाठी ते भाजपात आले. अशी टीका आमदार महेश लांडगे यांनी अजित पवारांवर केली आहे.
महेश लांडगे म्हणाले की, माझी प्रॉप्रर्टी किती आहे, त्याची कागदपत्रे मी दाखवतो. अगोदर त्यांच्या मुलाने काय केले ते पाहावे. सन १९९१ पूर्वी ते काय होते. तब्बल ३० वर्षे ते सत्तेत आहेत. त्यांची किती प्रॉप्रर्टी वाढली. त्यांना सोन्याचा परीस मिळाला आहे का, ऊर्जामंत्री असताना ७० हजार कोटींचा घोटाळा लपविण्यासाठी ते भाजपात आले. आले नसते तर, काय झाले असते हे त्यांना विचारा. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी त्याला उत्तर दिले आहे की आम्ही यांना का सांभाळले आहे. मला जास्त बोलायला लावू नका.

महेश लांडगे यांनी ७० हजार कोटींच्या कथित घोटाळ्याचा उल्लेख करत अजित पवारांवर टीका केली. ७०  हजार कोटींचा घोटाळा करणारे अजित पवार हेच महाराष्ट्रातील भ्रष्टाचाराचे आका आहेत. आम्हीही पुराव्यानिशी आरोप करू, पण ते आरोप त्यांना सहन होणार नाहीत. उमेदवारी मागायला कुणी येत नसल्यामुळे अजित पवार चिडचिड करत आहेत. चिठ्ठी वाचून स्क्रिप्टेड भाषण करणं ही त्यांची सवय झाली आहे. त्यांच्याकडे मोठे डायरेक्टर आणि चाणक्य असतील, पण बिनबुडाचे आरोप करू नयेत, असा टोला त्यांनी लगावला.
लांडगे म्हणाले कि अजित पवार पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात सक्रिय आहेत. ते कायम सत्तेत राहिले. राज्याचं नेतृत्व करण्याची संधीही त्यांना मिळाली. मात्र त्यांनी नेमकं काय केलं? उंटावर बसून शेळ्या हाकण्याचंच काम केलं, असा घणाघात त्यांनी केला. शरद पवार यांनी त्यांना मोठं केले. त्यांना पिंपरी-चिंचवड शहरात कोण ओळखत होते. त्यांना मोठे करणाऱ्या शरद पवारांची साथ सोडून ते भाजपासोबत आले. भ्रष्टाचार लपवण्यासाठीच ते भाजपसोबत आले आहेत का? असा सवाल लांडगे यांनी उपस्थित केला.

Leave a Comment

अधिक वाचा