यवतमाळमध्ये प्राध्यापकाकडून शिक्षणकार्याला गालबोट, शिक्षकाच्या दुष्कृत्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

SHARE:

यवतमाळ – जिल्ह्यात प्राध्यापकाकडून शिक्षणकार्याला गालबोट लावले आहे. तर या शिक्षकाच्या दुष्कृत्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामूळे वाद सुरू झाला आहे. विद्यार्थिनीला घरी एकटीला बोलवून महाविद्यालयीन प्राध्यापकानी एका मूलीशी अश्लील चाळे केले आहेत.

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी शिक्षकाला चांगलाच धडा शिकविला आहे. राज्यातील शिक्षण क्षेत्रातील शिक्षक जर चुकीचे वागत असेल तर मूलांचे भवितव्य काय करणार असणार आहे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. शिक्षक शिक्षणकार्य करण्याऐवजी मूलींशी अश्लील चाळे करत असतील , तर राज्यातील मूलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न आता पुन्हा निर्माण होतो आहे. महाविद्यालयातील ही घटना विद्यार्थ्यांच्या लक्षात येताच विद्यार्थ्यांनी या शिक्षकांवर कडक कारवाईची मागणी केली आहे.

इंजिनियरिंग कॉलेजचा प्राध्यापक एका कॉलेजच्या मूलीला अश्लील मेसेज पाठवत होता. या कॉलेजच्या प्राध्यापकाने दुष्कृत्यांच्या मर्यादा ओलाडल्या होत्या. विद्यार्थिनीशी अंगलट करण्याचा प्रयत्न वारंवार करत होता. यवतमाळ मधील एका नामांकित महाविद्यालयामध्ये शिक्षणकार्य करण्याऐवजी एका शिक्षकाने असे चाळे केल्यामुळे राज्यातील शिक्षणक्षेत्राला आणि शिक्षणकार्याला मोठी बदनामी झाली आहे. गंभीर बाब म्हणजे सोशल मीडियावरल का शिक्षकाच्या दुष्कृत्यांचे अश्लील व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. आणि त्या प्राध्यापकाला देण्यात आलेली शिक्षा ही सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यामूळे शिक्षण क्षेत्रातील अनेकांनाच धक्का बसला आहे.

नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजमधील या प्राध्यापकाला विद्यार्थ्यांनी मारले आहे. रसायनशास्त्र विभागाचा हा प्राध्यापक विद्यार्थिनीला व्हॉटसअपवर अश्लील मेसेज पाठवत होता. या प्राध्यापकाने दुष्कृत्यांच्या मर्यादा ओलाडल्या होत्या. महाविद्यालयात विद्यार्थिनीला चुकीचा पध्दतीने करत होता. याबाबत यवतमाळच्या इंजिनियरिंग कॉलेजमधील विद्यार्थीनींनी, मैत्रिणी, मित्रांना सांगितल्यामूळे हा प्रकार समोर आला आहे. या प्राध्यापकानं विद्यार्थिनीशी अंगलट करण्याचा प्रयत्न सुरू ठेवल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी त्या शिक्षकाला महाविद्यालयात मारले आहे.

यावेळी विद्यार्थिनींनी देखील त्याची महाविद्यालयातील स्टाफ, विद्यार्थ्यांसमोर चांगलीच खरडपट्टी काढली आहे. त्या शिक्षकाने केलेल्या व्हाटसअप चॅटचे पुरावे विद्यार्थिनींनी प्राचार्यांपुढे सादर केले आहेत. प्राध्यापकाला झालेल्या या मारहाणीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. याप्रकरणी अद्याप पोलिसांमध्ये तक्रार दायाल झाली नाही. त्यामुळे आता महाविद्यालय प्रशासनाने या प्राध्यापकाविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी विद्यार्थिनींनी केली आहे. यवतमाळमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

Leave a Comment

अधिक वाचा