मुंबईत मराठी तरूणाला मारहाण व जातीवाचक शिवीगाळ प्रकरणात रहेजा बिल्डरला अटक होणार

SHARE:

मुंबई – मराठी तरूणाला मारहाण व जातीवाचक शिवीगाळ प्रकरणात, रहेजा बिल्डरला अटक होणार आहे. तुम जय भीम वाले लोग कभी सुधरेगा नही असे वक्तव्य करणार्या व मराठी तरुणाला मारहाण करणाऱ्या मुंबईतील रहेजा बिल्डरला आता अटक होणार आहे. मुंबईत बिल्डर सुशील रहेजांच्या ऑफीसची तोडफोड करण्यात आली आहे. मुंबईतील वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून तोडफोड करण्यात आली आहे. मुंबईतील एका मराठी तरुणाला जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप करत, सुशील रहेजांना अटक करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.

मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सुशील रहेजाचा अरेरावीपणा समोर आला आहे. एका मराठी तरूणाला मारहाण करत त्याने जातीवाचक शिवीगाळ केल्याचा गंभीर आरोप मुंबईतील गोवंडी येथील एका तरूणाकडून करण्यात आला आहे. रहेजा बिल्डरने तुम घाटी, जय भीम वाले लोग कभी सुधरोगे नही असे म्हणत एका मराठी तरूणाला मारहाण केली असल्याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणात सुशील रहेजाविरोधात गोंवडी पोलीसस्टेशनमध्ये मराठी तरूणाला मारहाण आणि जातीवाचक शिवीगाळ प्रकरणात ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मराठी तरुणाला मारहाण करणाऱ्या रहेजा बिल्डरला आता अटक होणार आहे. या प्रकरणानंतर मुंबईत पुन्हा एकदा मराठी अमराठीचा वाद वाढलेला दिसत आहे.

काही दिवसांपूर्वी मुंबईतील सुशील रहेजा बिल्डरने त्याच्याकडे कामास असलेल्या राहुल जाधव बेदम मारहाण केली होती व जातीवाचक शिवीगाळ केली होती. आणि ऑफिसमध्ये सर्व स्टाफसमोर त्याला मारहाण केली होती. यावरून मुंबईत वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले आहे. रहेजा बिल्डर विरोधात मुंबईतील गोवंडी पोलीस स्टेशनमध्ये अट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरीसुद्धा आरोपी रहेजा बिल्डरला पोलिसांनी अटक केली नाही. यांवरून गोवंडी परिसरातील नागरिकांनी संताप व्याक्त केला होता.

सुशील रहेजा त्याच्या चेंबूर येथील ऑफिसमध्ये असल्याचे समजल्यावर, मुंबईतील वंचित बहुजन आघाडी महिला आघाडीच्या मुंबई प्रदेशाध्यक्षा स्नेहल सोहनी, वंचित बहुजन युवा आघाडीचे सागर गवई यांनी रहेजा बिल्डरच्या ऑफिसमध्ये गेले होते, तो रहेजा बिल्डर तिथून पळून गेला आहे. या घटनेनंतर नंतर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सुशील रहेजाचे ऑफिस फोडले आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडीने रहेजा बिल्डरला अटक करण्याची मागणी केली आहे.

पीडित तरुण राहुल जाधव हा बिल्डर सुशील रहेजाकडे कामाला आहे. मारहाण व शिवीगाळ झालेल्या या घटनेच्या दिवशी पीडित तरुण राहुल जाधवने कागदपत्रे नीट स्टेपल न केल्याचा राग मनात धरून रहेजा बिल्डर यांनी राहुलला मारहाण केली होती. व तुम घाटी, जय भीम वाले लोग कभी सुधरेगा नही असे, वादग्रस्त वक्तव्य केले होते आणि जातीवाचक शब्द वापरून मराठी तरूणाचा अपमान केला व बिल्डरने स्टाफ समोरच मारहाण केली होती. यावरून वंचित बहुजन आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे. याप्रकरणात आता गोवंडी पोलिसांकडून चेंबुरमधील सुशील रहेजा बिल्डरला अटक होणार आहे. याप्रकरणात अधिक तपास गोवंडी पोलिस करत आहे.

Leave a Comment

अधिक वाचा