रशियामध्ये एका वैद्यकीय विद्यापीठात भारतासह इतर देशातील अनेक विद्यार्थ्यांवर चाकू हल्ला; एक भारतीय विद्यार्थी गंभीर जखमी

SHARE:

नवी दिल्ली – रशियामध्ये एका वैद्यकीय विद्यापीठात भारतासह इतर देशातील अनेक विद्यार्थ्यांवर चाकूने हल्ला करण्यात आला आहे. तर या घटनेत एक भारतीय विद्यार्थी जखमी झाला आहे. रशियामध्ये एका शैक्षणिक विद्यापीठात भारतीय विद्यार्थ्यांसह अनेकांवर चाकू हल्ला करण्यात आला आहे. रशियामधील बाशकोर्तोस्तानमधील उफा येथील एका वैद्यकीय विद्यापीठात भारतीय मूलांवर चाकू हल्ला झाला आहे. या हल्ल्यात भारतीय विद्यार्थ्यांसह अनेक जण जखमी झाले आहेत. भारतीय दूतावासाने शनिवारी रात्री 7 फेब्रुवारी 2026 रोजी या घटनेची माहिती दिली आहे. भारतीय दुतावासाने सांगितले आहे की, रशियामधील हल्ला झालेल्या घटनेतील सर्व जखमी विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर माहिती देत अससताना भारतीय दूतावासाने म्हटले आहे की, रशियातील उफा येथे वैद्यकीय महाविद्यालयात भारतीय मूलांसाह इतर अनेक देशातील मूलांवर चाकू हल्ला झाला आहे, ज्यामध्ये 4 भारतीय विद्यार्थी जखमी झाले आहेत. भारतीय दूतावासाने सांगितले की, ते भारतीय विद्यार्थी रशियामधील स्थानिक अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. आणि भारतातील जखमी विद्यार्थ्यांना सर्व शक्य ती मदत करण्यासाठी काझानमधील भारतीय वाणिज्य दूतावासाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत.

शनिवारी ७ फेब्रुवारी २०२६ रोजी एका १५ वर्षीय मुलाने रशियातील उफा येथील स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमध्ये अचानक प्रवेश केला होता. चाकू हल्ला करणारा आरोपी वसतिगृहात गेला आणि तिथे असलेल्या काही विद्यार्थ्यांवर अचानक चाकूने हल्ला केला आहे. हा हल्ला इतका अचानक होता की, विद्यार्थी घाबरून गेले. रशियातील गृह मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, या आरोपीने भारतासह इतर देशातील अनेक विद्यार्थ्यांवर चाकूने हल्ला केला आहे. रशियन पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला तेव्हा, त्याने २ पोलिस अधिकाऱ्यांवर हल्ला केला आहे.

आरोपीला अटक करत असताना आरोपी स्वतः जखमी झाला आहे. रशियातील गृह मंत्रालयाच्या प्रवक्तया मेजर जनरल इरिना वोल्क म्हणाल्या आहेत की, या आरोपीला पकडताना पोलिस अधिकारी जखमी झाले आणि हल्लेखोराने स्वतःलाही जखमी केले आहे. या विद्यापीठातील विद्यार्थ्याच्या चाकू हल्ल्यात एकाची प्रकृती गंभीर आहे. रशियन आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, हल्ल्यात जखमी झालेल्या ४ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. किशोरवयीन हल्लेखोराला बाल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, आणि त्याची प्रकृतीही गंभीर आहे.

हा चाकू हल्ला करणारा आरोपी हा रशियात बंदी घातलेल्या नव-नाझी संघटनेशी संबंधित होता. हल्ल्यात तो राष्ट्रवादाच्या घोषणा देत होता. रशियातील तपास यंत्रणांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे. आणि त्यांच्याकडून प्रत्येक घटनेची तपासणी सुरु झाली आहे. रशियातील या घटनेनंतर विद्यापीठ आणि आजूबाजूच्या परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. रशियातील या घडलेल्या घटनेच्या सर्व परिस्थितीवर रशियन पोलिसांकडून बारकाईने लक्ष ठेवले जात आहे, आणि भारतीय विद्यार्थ्यांची सुरक्षा ही त्यांची प्राथमिकता आहे, असे भारतीय दुतावासाने म्हटले आहे.

Leave a Comment

अधिक वाचा