हिंदुत्वाच्या नावाखाली देशभरात गोहत्येचे राजकारण सुरू आहे, त्यातून जनतेची माथी भडकवली जात आहेत, त्यावर आरएसएस का बोलत नाही?, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा आरएसएसच्या मोहन भागवतांना प्रश्न

SHARE:

मुंबई – हिंदुत्वाच्या नावाखाली देशभरात गोहत्येचे राजकारण सुरू आहे, त्यातून जनतेची माथी भडकवली जात आहेत, त्यावर आरएसएस कधी बोलणार आहे, का बोलत नाही, असा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आरएसएसच्या मोहन भागवतांना प्रश्न विचारला आहे. राज्यात मराठी माणसाला डिवचत गुजराती भाषिकांना आधार देण्याचा प्रयत्न’ आरएसएस करत आहे. मोहन भागवतांच्या वक्तव्यावर राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे. मोहन भागवतांना एक गोष्ट सांगू इच्छितो की, कार्यक्रमात ती सर्व मंडळी तुमच्या प्रेमाखातर आली नव्हती तर, ती नरेंद्र मोदी यांच्या सरकारी भीतीमुळे आली होती, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

मुंबईत आरएसएसचे मोहन भागवत यांनी महाराष्ट्रातील मराठी विरुद्ध अमराठी वादाबाबत बोलल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे. भाषिक आधारावर भेदभाव करणे हा स्थानिक आजार आहे, असे मोहन भागवत बोलले होते मोहन भागवत यांच्या या वक्तव्याबद्दल राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे. मराठी माणूस सहनशील आहे पेक्षा इथले सत्ताधारी लाचार आहेत म्हणून भागवतांची बोलण्याची हिंमत होते. काही महिन्यांपूर्वी निवडणुकीच्या तोंडावर भय्याजी जोशींनी मुंबईची भाषा ही फक्त मराठी नाही तर ती गुजराती पण आहे असे वादग्रस्त विधान केले होते. मराठी माणसाला डिवचत गुजराती भाषिकांना मतासाठीजवळ करण्याचा प्रयत्न केला आहे. हे सगळे करून अप्रत्यक्षपणे भाजपाला फायदा कसा होईल हे पाहिले जाते. मुळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मराठी व अममराठी या वादात पडायचे कशाला?, असा प्रश्न राज ठाकरे यांनी मोहन भागवत यांना विचारला आहे.

भारत देशात भाजपा सरकारच्या काळात जे गोहत्येचे राजकारण करून जो तमाशा सुरू आहे आणि त्यातून भरातातील जनतेची माथी भडकवली जात आहेत त्यावर आरएसएस कधी बोलणार आहे, असा प्रश्न राज ठाकरे यांनी भागवतांना विचारला आहे. या देशात भाषावार प्रांतरचना या देशात का करावी लागली हा इतिहास भागवतांना माहीत नसावा. मराठी भाषेबद्दलचे प्रेम, प्रांताबद्दलचे प्रेम हा जर भागवतांना आजार वाटत असेल तर हा आजार या देशातील इतर राज्यांमध्ये पण आहे, असे राज ठाकरे म्हणाले आहेत.

राज्यातील मराठी माणसांना त्रास होत असताना, त्या विरोधात भूमिका घेणारा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हाच पक्ष आहे, जे चूक ते चूकच हे आम्ही रोखठोक बोलतो. तसे आरएसएस का बोलत नाही? देशात भाजपा सरकारच्या काळात हिंदुत्वाच्या नावाखाली देशभरात जो धिंगाणा सुरु आहे, उत्तर भारतात कावड यात्रांमधे चुकीच्या पद्धतीने महिलांना नाचवले जाणे, तसेच भारत देश हा बीफ एक्सपोर्ट मध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे, त्यावर आरएसएस का बोलत नाही? त्या बीफ व्यापाऱ्यांच्या विरोधात आरएसएस भाजपा सरकारला का बोलत नाही? असा प्रश्न राज ठाकरे यांनी मोहन भागवत यांना विचारला आहे. आमच्यासाठी मराठी भाषा आणि मराठी माणूस हे सर्वोच्च प्राधान्य आहे, या देशात भाषिक आणि प्रांतिक अस्मिता या राहणार आहे, असे राज ठाकरे म्हणाले आहेत.

Leave a Comment

अधिक वाचा