मुंबई – राज्यात माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून ५ ओटीटी प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्यात आली आहे. सरकारकडून पोर्नोग्राफिक कंटेंटविरुद्ध मोठी कारवाई करण्यात आली आहे. तर सरकारकडून ५ ओटीटी प्लॅटफॉर्मवर बंदी घातली आहे. ओटीटी क्षेत्रात पोर्नोग्राफीला आळा घालण्यासाठी सरकारने आता बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. राज्यातील माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून ५ ओटीटी प्लॅटफॉर्म ब्लॉक केले आहेत. सरकारने म्हटले आहे की, हे प्लॅटफॉर्म आक्षेपार्ह आणि अश्लील सामग्री प्रसारित करत होते, जे देशातील कायदा आणि आयटी नियमांचे उल्लंघन करत आहे.
ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर लक्ष ठेवण्यासाठी आणि नियमांची कडक अंमलबजावणी होण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे. मंगळवारी सरकारने ५ ओटीटी प्लॅटफॉर्मना ब्लॉक केले आहे. आणि त्यांच्यावर कडक कारवाई केली आहे. ब्लॉक केलेल्या ओटीटी प्लॅटफॉर्ममध्ये मूडएक्सव्ही आयपी, कोयल प्लेप्रो, डिजी मूव्हीप्लेक्स, फील आणि जुगनू या ओटीटी प्लॅटफॉर्मचा समावेश आहे. सरकारने इंटरनेट सेवा प्रदात्यांना या प्लॅटफॉर्मवरील प्रवेश त्वरित ब्लॉक करण्याचे आदेश दिले आहेत.
माहिती तंत्रज्ञान नियम २०२१ आणि अश्लीलता कायद्यांतर्गत करण्यात ही कडक कारवाई करण्यात आली आहे. या नियमांचा उद्देश डिजिटल प्लॅटफॉर्मवर सार्वजनिक सभ्यता राखणे, राष्ट्रीय हितांचे रक्षण करणे आणि ऑनलाइन सामग्रीसाठी नैतिक मानके लागू करणे आहे. सरकारकडून ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी कडक आदेश देण्यात आले आहेत. सरकारचे म्हणणे आहे की, ऑनलाइन प्लॅटफॉर्मना इतर माध्यमांप्रमाणेच जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील.
जर कोणत्याही प्लॅटफॉर्मने नियमांचे उल्लंघन केले किंवा आक्षेपार्ह मजकूर प्रदर्शित केला, तर कडक कारवाई केली जाणार आहे, असे राज्य सरकारने म्हटले आहे. देशातील माहिती तंत्रज्ञान कायदा २००० च्या कलम ६९ अ अंतर्गत ही कडक कारवाई करण्यात आली आहे. या कलमा अंतर्गत, राष्ट्रीय सुरक्षा, सार्वजनिक सुव्यवस्था किंवा इतर कायदेशीर कारणांसाठी सरकारला ऑनलाइन सामग्री किंवा वेबसाइट ब्लॉक करण्याचा अधिकार आहे. सरकारच्या या कृतीकडे डिजिटल क्षेत्रातील कंटेंट नियमनाबाबत कडक संदेश म्हणून पाहिले जात आहे. आता ऑनलाइन ओटीटी प्लॅटफामला कायदेशीर बाबींवर लक्ष देण्याची गरज आहे, अन्यथा सरकारकडून कडक कारवाई करण्यात येणार आहे, असे माहिती व प्रसारण विभाग प्रशासनाने म्हटले आहे.




