ओडिसा – राज्यात खाण अधिकाऱ्याच्या घरावर धाड टाकण्यात आली आहे, तर या प्रकरणात ४ कोटींहून अधिक रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. ओडिशा राज्यात खाण अधिकाऱ्याला अटक केली आहे. ओडिसा राज्यात भ्रष्टाचाराविरोधी मोठी कडक कारवाई करण्यात आली आहे. ओडिसा राज्यातील खाण अधिकाऱ्याच्या घरातून ४ कोटींहून अधिक रोकड जप्त केली आहे.
ओडिशा राज्यातील दक्षता विभागाने कटक सर्कलमधील खाणींचे उपसंचालक देवव्रत मोहंती यांना लाच स्वीकारताना पकडले आहे. त्यांच्या ताब्यातून ४ कोटी रुपयांहून अधिक रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. ओडिसा राज्याच्या इतिहासातील दक्षता विभागाने केलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे. रोख रक्कम जप्त केल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. माहितीनुसार, कटक सर्कलमध्ये कार्यरत असलेले खाणींचे उपसंचालक देवव्रत मोहंती यांनी, एका परवानाधारक कोळसा व्यापाऱ्याकडून त्याचा कोळसा डेपो सुरळीत चालवण्यासाठी, आणि कोळशाच्या वाहतुकीला परवानगी देण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.
या तक्रारीनंतर ओडिशा दक्षता विभागाने सापळा रचत मंगळवारी 24 फेब्रुवारी 2026 रोजी कडक कारवाई केली आहे. खाणींचे उपसंचालक देवव्रत मोहंती यांना ३० हजार रुपयांची लाच स्वीकारताना पकडले आहे. त्यांच्या ताब्यातून लाच घेतल्याची संपूर्ण रक्कम जप्त करण्यात आली आहे, व त्यांना अटक करण्यात आली आहे. खाण अधिकार्याला अटक केल्यानंतर दक्षता विभागाने एकाच वेळी ओडिसा राज्यात ३ ठिकाणी धाड टाकली आहे.
खाणींचे उपसंचालक देवव्रत मोहंती यांच्या भुवनेश्वर येथील निवासस्थानी, भद्रक जिल्ह्यातील मथासाही येथील वडिलोपार्जित घरी, तसेच कटक येथील कार्यालयात झडती घेण्यात आली आहे. भुवनेश्वरमधील पाटिया परिसरातील श्रीविहार नेचर क्रेस्ट अपार्टमेंटमधील त्यांच्या फ्लॅटमध्ये मोठ्या प्रमाणात रोख रक्कम सापडली आहे. ही रक्कम ट्रॉली बॅग आणि कपाटांमध्ये लपवून ठेवण्यात आली होती. माहितीनुसार, जप्त केलेली रक्कम ४ कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. सध्या जप्त केलेल्या रोकड रकमेची मोजणी सुरू आहे.
अंतिम आकडा मोजणी पूर्ण झाल्यानंतर जाहीर केला जाणार आहे. अधिकाऱ्यांच्या मते, ओडिसा राज्यातील सतर्कता विभागाच्या कारवाईत इतक्या मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम जप्त करण्याची ही पहिलीच वेळ आहे. या धाडीतून खाण अधिकारी मोहंती यांच्या इतर संपत्तीबाबतही माहिती समोर आली आहे. भुवनश्वरमधील पहाला परिसरात त्यांचे दुमजली घर असल्याचे उघड झाले आहे.
याशिवाय १३० ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. अधिकाऱ्यांकडून इतर मालमत्ता आणि आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू आहे. बेहिशोबी संपत्तीबाबत अधिक तपास केला जात आहे. या खाण घोटाळ्यातील कारवाईमुळे ओडिसा राज्यातील प्रशासकीय यंत्रणेत खळबळ उडाली आहे. ओडिसा राज्यातील भ्रष्टाचाराविरोधात खाण घोटाळा प्रकरणात ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.




