भारत की इंग्लंड… टी-२० विश्वचषक उपांत्य फेरी मध्ये कोणाचं पारड भारी ? कोण गाठणार अंतिम सामना जाणून घ्या

SHARE:

खेळ – टीम इंडियाने टी-२० वर्ल्ड कप २०२६ च्या सेमीफायनलमध्ये स्थान निश्चित केले आहे. रविवारी झालेल्या सामन्यात टीम इंडियाने वेस्ट इंडिजचा ५ विकेट्सने पराभव करून सेमीफायनलमध्ये धडक मारली. येत्या ५ मार्च रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सेमीफयानलमध्ये भारताचा सामना इंग्लंडशी होईल. टी-२० वर्ल्डकपच्या सेमाफायनलमध्ये पोहोचण्याची टीम इंडियाची ही सहावी वेळ आहे. तसेच सलग तिसऱ्यांदा सेमीफायलनची फेरी त्यांनी गाठली आहे.

सेमी फायनलमध्ये कोणत्या संघाचं पारडं भारी ?
टी-२० वर्ल्ड कपच्या गेल्या दोन आवृत्त्यांमध्ये (२०२२ आणि २०२४ ), भारतीय संघाने फक्त इंग्लंडविरुद्ध उपांत्य फेरी खेळली आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील हा सलग तिसरा टी-२० वर्ल्डकप सेमीफायनल सामना आहे. गेल्या दोन सामन्यांचे निकाल पाहता, भारत किंवा इंग्लंड यापैकी जो संघ उपांत्य सामना जिंकला आहे, तो चॅम्पियन ठरला आहे.

टी-२० वर्ल्ड कप २०२२ सेमीफायनलमध्ये इंग्लंड ठरला विजेता
टी-२० वर्ल्ड कप २०२२ च्या सेमीफायनलमध्ये भारत वि इंग्लंड सामना झाला होता. अ‍ॅडलेडमधील सामन्यात रोहित शर्माच्या टीम इंडियाने ६ बाद १६८ धावा केल्या. जोस बटलरच्या इंग्लंडने १६ षटकांत एकही गडी न गमावता १७० धावा केल्या आणि सामना १० विकेट्सने जिंकला. अंतिम सामन्यात पाकिस्तानला हरवून इंग्लंडने वर्ल्डकपचे विजेतेपद पटकावले.

भारताने टी-२० वर्ल्ड कप २०२४ सेमीफायनलमध्ये मारली बाजी
टी-२० वर्ल्ड कप २०२४ च्या सेमीफायनलमध्ये पुन्हा एकदा, रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया आणि बटलरच्या नेतृत्वाखालील इंग्लंड आमनेसामने आले. जॉर्जटाऊन येथे झालेल्या सामन्यात भारतीय संघाने ७ गडी गमावून १७१ धावा केल्या. इंग्लंडचा संघ १६.४ षटकांत १०३ धावांवर गारद झाला आणि त्यांना ६८ धावांनी पराभव पत्करावा लागला. अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून भारताने विजेतेपद पटकावले.

भारत आणि इंग्लंडने दोनदा जिंकला टी-२० वर्ल्डकप
भारत आणि इंग्लंड यांच्यातील शेवटच्या दोन सेमीफायनल सामन्यांमध्ये विजय मिळवणाऱ्या संघाला विजेतेपद मिळाले आहे. ५ मार्च रोजी होणाऱ्या टी-२० वर्ल्डकप २०२६ च्या दुसऱ्या उपांत्य सामन्यातील विजेता यावेळी विजेता म्हणून उदयास येईल हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. भारतीय संघाने २००७ आणि २०२४ मध्ये टी२० वर्ल्डकप जिंकला होता तर इंग्लंडने २०१० साली २०२२ मध्ये विजेतेपद पटकावलं.

Leave a Comment

अधिक वाचा