पुण्यामध्ये शैक्षणिक क्षेत्राला हादरवून टाकणारी घटना; सिंहगड डेंटल कॉलेजच्या विभागप्रमुखाची आत्महत्या

SHARE:

पुणे – पुण्यामध्ये शैक्षणिक क्षेत्राला हादरवून टाकणारी घटना घडली आहे. सिंहगड डेंटल कॉलेजच्या विभागप्रमुखाने आत्महत्या केली आहे. पुण्यातील शिक्षण क्षेत्रातील सिंहगड डेंटल कॉलेजचे विभागप्रमुख राजू पाटील यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुणे शहरातील शैक्षणिक क्षेत्राला हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. या घटनेमुळे महाविद्यालयीन वर्तुळात खळबळ उडाली आहे. पुणे पोलिसांना घटनास्थळी आत्महत्येपूर्वी लिहिलेली सुसाईड नोट सापडली आहे, असे पुणे पोलिसांनी माहिती दिली आहे.

आत्महत्या केलेल्या प्राध्यापकांचे नाव राजू पाटील आहे. ते सिंहगड डेंटल कॉलेज येथे विभागप्रमुख एचओडी म्हणून कार्यरत होते. त्यांच्या आकस्मिक मृत्यूमुळे कुटुंबीयांसह सहकारी प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांमध्ये दुःख पसरले आहे. ही घटना शनिवारी दुपारी उघडकीस आली आहे. त्या वेळी पाटील यांच्या पत्नी घरी आल्या असता त्यांना ही बाब लक्षात आली आहे. त्यांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर पुणे पोलिस घटनास्थळी पोहोचले. पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

घटनास्थळी सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये कामाच्या ताणामुळे आत्महत्येचा निर्णय घेतल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, आत्महत्येमागील नेमके कारण काय आहे, याबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत. काही दिवसांपूर्वी सिंहगड डेंटल कॉलेजवर शैक्षणिक नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली होती. शिक्षकांचे थकीत वेतन, तसेच शैक्षणिक कामकाजातील त्रुटींकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवत, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांनी महाविद्यालयाची संलग्नता रद्द केली होती.

विद्यापीठ अधिनियमातील तरतुदींचे उल्लंघन केल्याचा आरोप महाविद्यालयावर ठेवण्यात आला होता. तसेच विद्यापीठाने निश्चित केलेल्या शैक्षणिक दर्जानुसार महाविद्यालयाचे कामकाज होत नसल्याचे आढळल्याने दंतविद्याशाखेतील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांनाही बंद करण्यात आले होते. या विभागप्रमुखांच्या सुसाईड नोटमध्ये कामाच्या ताणाचा उल्लेख आल्यामुळे विविध तर्क व्यक्त केले जात आहेत.

Leave a Comment

अधिक वाचा