नाशिक – युद्धामुळे नाशिकच्या एमआयडीसीत अनेक उद्योग बंद पडले आहेत. तर गॅस पुरवठ्याअभावी येथील १२०० उद्योगांना फटका बसला आहे. युद्धाची झळ महाराष्ट्रापर्यंत बसण्यास सुरूवात झाली आहे. तर नाशिकमधील १२०० उद्योगांना फटका बसला आहे. इराण अमेरिका, इस्त्राईल युद्धाची झळ आता जगभरात बसताना दिसुन येत आहे. आखाती देशांमध्ये सुरु असलेल्या या संघर्षामुळे तेलाचा तुटवडा जाणवू लागला आहे. या युद्धामुळे महाराष्ट्रातील नाशिक शहराच्या अंबड व सातपूर एमआयडीसी येथील अनेक उद्योग बंद पडले आहेत. नाशिक शहरामध्ये गॅस पुरवठ्याअभावी येथील १२०० उद्योगांना फटका बसला आहे.
युद्धाचा भारतातील गॅस पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. युद्धामुळे नाशिकमधील १२०० सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग बंद झाले आहेत. त्यात राज्य शासनाने व्यावसायिक एलपीजी बंद करण्याचे आदेश दिले आहेत. तर एमएनजीएलकडून ४० टक्के पुरवठा कपात करण्याच आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे नाशिक शहरातील प्लेटिंग, पावडर कोटिंग उद्योग संकटात सापडले आहेत. नाशिकला नियमित एक हजार २०० टन दरमहा एलपीजी गॅसचा पुरवठा एमआयडीसीमधील उद्योगांना केला जातो. आणि २ हजार टन एलपीजी गॅस नाशिक शहरातील हॉटेल व्यवसायाला पुरविला जातो. तर साडेतीन लाख किलो एमएनजीएल गॅसचा पुरवठा केला जात आहे.
युद्धामुळे नाशिक शहरातील गॅस पुरवठा थांबला आहे. नाशिक शहरातील सातपूर, अंबड एमआयडीसीतील प्लेटिंग, प्रोसेसिंग इंडस्ट्रीज असे छोटे मोठे १२०० ते १३०० उद्योग आहेत. नाशिकमधील लघू उद्योगांना दररोज १०० ते २०० किलो, मध्यम उद्योगांना दीड टन किलो आणि मोठ्या उद्योगांना अधिक गॅस लागतो. यात ९७ टक्के एलपीजी घरगुती वापरासाठी आणि ३ टक्के व्यावसायिक वापरासाठी दिला जातो. आता ३ टक्के व्यावसायिक पुरवठा पूर्णपणे बंद करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत.
राज्य सरकारने एलपीजी गॅस पुरवठा बंद करून दर ६८ रुपयांवरून ८६ रुपये केला आहे. आणि सबसिडी बंद करून टाकली आहे. त्यामुळे एलपीजी वापर करणारे नाशिक शहरातील उद्योग संकटात सापडले आहेत. एमएनजीएलची पाइपलाइन नाशिकमधील सर्व उद्योगात पोहोचलेली नाही. तरीही एमएनजीएलने ४० टक्के पुरवठा कमी करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. त्यामूळे नाशिक शहरातील जवळपास बाराशे उद्योगांना मोठा फटका बसला आहे.





