आदिवासी मुलांच्या वस्तीगृहात विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचा प्रकार उघड; पिंपरी चिंचवड मधील घटना

SHARE:

पिंपरी चिंचवड – पिंपरी चिंचवडमध्ये आदिवासी मुलांच्या वस्तीगृहात विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचा प्रकार उघड झाला आहे. आदिवासी मुलांच्या शासकीय वस्तीगृहात विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये वस्तीगृहात दूषित पाणी प्यायल्यामुळे विद्यार्थ्यांना उलटी, मळमळ झाल्याने उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले आहे. पिंपरी चिंचवडमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. पिंपरी चिंचवडमधील आदिवासी मुलांच्या शासकीय वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याच्या घटनेने राज्यातील आदिवासी वस्तीगृहात दूषित पाणी प्यायल्यामुळे २० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना उलटी, मळमळ याचा त्रास झाला आहे.

त्यामुळे मुलांना भोसरी येथे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर 10 मुलांवर अजूनही उपचार सुरू आहेत. पिंपरी चिंचवडमधील आदिवासी वस्तीगृहात हा प्रकार घडल्यामुळे खळबळ उडाली आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी असा हलगर्जीपणा करणे अत्यंत निंदनीय आणि गंभीर बाब आहे. या बद्दल प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई यांनी या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून संबंधित गृहपाल राजकुमार राक यांच्यावर कठोर कारवाई करावी आणि त्यांची या वस्तीगृहातून कायमची हकालपट्टी करावी, अशी मागणी आदिवासी संघटनेने केली आहे.

तसेच संबंधितांवर कारवाई झाली नाही, तर वस्तीगृहात तीव्र निषेध आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आदिवासी संघटनने दिला आहे. आदिवासी मुलांच्या शासकीय वस्तीगृहात २० विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्यामूळे राज्यातील सरकारी वस्तीगृहातील मनमानी कारभार उघडकीस आला आहे. राज्य सरकारचे समाजकल्याणच्या नावावर चालणार्या सरकारी वस्तीगृहावर दृर्लक्ष झालेले आहे, त्यामूळे अशा घटना होत आहेत. राज्यातील सरकारी वस्तीगृहातील अनेक मुलांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

Leave a Comment

अधिक वाचा