दहशत माजवणारा कुख्यात गुंड हर्षद पाटणकर आणि त्याचा साथीदार श्रवण पगारेला अटक; नाशिक शहर पोलिसांची मोठी कार्यवाही

SHARE:

नाशिक – शहरात दहशत माजवणारा कुख्यात गुंड हर्षद पाटणकर आणि त्याचा साथीदार श्रवण पगारेला अटक करण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या हर्षद पाटणकरला नाशिक पोलिसांनी अटक केली आहे. नाशिक शहरातील पंचवटी परिसरात दहशत माजवणारा कुख्यात गुंड हर्षद पाटणकर आणि त्याचा साथीदार श्रवण पगारेला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. नाशिक शहरात वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी कडक कारवाई सुरू केली आहे.

या कारवाईमुळे नाशिक शहरातील गुन्हेगारी टोळ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. नाशिक पोलिसांच्या कारवाईचा धाक पुन्हा निर्माण झाल्याचे चित्र आहे. नाशिक जिल्ह्यात वाढत्या खून, मारहाण, चोरी आणि दहशत निर्माण करणार्या घटनांच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांकडून नाशिक जिल्ह्यात मोठी मोहीम राबवली आहे. या मोहिमे अंतर्गत नाशिक जिल्ह्यातील गुन्हेगारांवर लक्ष ठेवून कडक कारवाई केली जात आहे. नाशिक शहरातील पंचवटी परिसरात धारदार शस्त्र घेऊन नागरिकांना धमकावत दहशत पसरवणाऱ्या पाटणकर टोळीवर पोलिसांनी कडक कारवाई केली आहे.

गेल्या दहा महिन्यांपासून नाशिक शहरात हर्षद पाटणकर हा दहशत माजवत होता. विविध पोलीस ठाण्यांत त्याच्यावर खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, गोळीबारासह ९  हून अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत. गेल्या रविवारी पंचवटीतील हनुमानवाडी परिसरात त्याने आपल्या जुन्या साथीदारावर हल्ला करून पुन्हा एकदा दहशत निर्माण केली होती. त्यामुळे नाशिकमध्ये पोलिसांचा धाक उरला आहे का? असा प्रश्न निर्माण झाला होता. या घटनेची गंभीर दखल घेत नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुन्हे शाखेला तात्काळ कारवाईचे आदेश दिले होते.

सहाय्यक आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अचल मुदगल यांच्या पथकाने पाटणकरचा शोध घेतला आहे. तो साथीदार श्रवण पगारेसह शहरात येणार असल्याची माहिती मिळाली होती. नाशिक पोलिसांनी सापळा रचला आणि योग्य वेळी कडक कारवाई केली आहे. नाशिक पोलिसांनी घेराव घातल्याचे लक्षात येताच हर्षद पाटणकरने पुन्हा एकदा पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. परंतु पोलिसांच्या तावडीतून सुटण्यासाठी त्याने धावत्या वाहनातून उडी घेतली. मात्र, या प्रयत्नात तो जखमी झाला आहे. नाशिक पोलिसांनी त्याला पकडले आहे. सध्या हर्षद पाटणकर याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Leave a Comment

अधिक वाचा