सातारा – जिल्ह्यात मंत्री शंभूराज देसाई यांना धक्काबुक्की झाल्याचा प्रकार घडला आहे, तर पोलिसांकडून २ जणांना अटक करण्यात आली आहे. साताऱा जिल्ह्यात जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीवेळी शंभूराज देसाईंना धक्काबुक्की झाल्याचा प्रकार घडला आहे. दोन सदस्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सातारा जिल्हा निवडणुकीत झालेल्या मारहाण प्रकरणामुळे महायुतीमध्येच वादाची ठिणगी पडू लागली आहे. गेल्या महिनाभरापासून सातारा जिल्ह्याच्या राजकारणात सुरू आहे.
मात्र, जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत झालेल्या राड्याने युतीमध्येच वादाची ठिणगी पडू लागली आहे. त्याचा परिणाम मतदानावर झाला. या सगळ्या प्रकारावर शिवसेना शिंदे गटातून संताप व्यक्त करण्यात आला आहे. सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत सत्तेच्या हव्यासापोटी भारतीय जनता पक्षाने सर्व मर्यादा ओलांडल्याचा खळबळजनक आरोप सातारा जिल्ह्यातील शिंदे गटाने केला आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे गट सत्तेत मित्रपक्ष असले तरी, साताऱ्यात मात्र भाजप कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या मंत्र्याला पोलिसी बळाचा वापर करून धक्काबुक्की आहे, त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
सातारा जिल्ह्यात सत्ता स्थापनेसाठी भाजपकडून सत्तेचा गैरवापर झाल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. व शिंदे गटाने सत्तेचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे. उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांना पोलिसांच्या उपस्थितीत धक्काबुक्की करण्यात आली आहे. इतकेच नाही तर शिवसेनेच्या गोटातील दोन सदस्यांना ही सातारा पोलिसांनी अटक केली आहे. सातारा जिल्ह्यात ही जिल्हा परिषद निवडणूक आहे की, पोलिसांच्या बळावर केलेली सत्ता बळकावण्याची मोहीम असा प्रश्न उपस्थित होत आहे.
या घटनेमुळे शिंदे शिवसेनेच्या गटाकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे. भाजपने सत्तेसाठी आपल्याच मित्रपक्षाच्या पाठीत खंजीर खुपसला आहे, अशी भावना सातारा जिल्ह्यातील स्थानिक शिवसैनिकांनी व्यक्त केली आहे. साताऱा जिल्ह्यातील या निवडणुकीतील राड्यामुळे महायुतीमधील दरी आता वाढली आहे. सातारा जिल्हा परिषदेत भाजप हा २७ जागांवर विजयी झाला होता.
तर, राष्ट्रवादी काँग्रेसला २० आणि शिवसेना शिंदे गटाला १५ जागा मिळाल्या आहेत. तर, काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटनेला प्रत्येकी १ जागा मिळाली असून एक जागा अपक्ष उमेदवाराने जिंकली होती. सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या वेळी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षाचे सगळे नेते जिल्हा परिषदेत दाखल झाले होते.





