नाशिक – भोंदूबाबा प्रकरणात दीपक केसरकरांच्या निकटवर्तीयाची एसआयटीकडून चौकशी करण्यात आली आहे. अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांनंतर आणखी दीपक केसरकरांच्या निकटवर्तीयाची एसआयटीकडून कसून चौकशी झाली आहे. नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याच्याशी राजकीय संबंध असल्यामुळे रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील ज्योतिषी अशोक खरात प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले आहे.
या प्रकरणाचे परिणाम राज्याच्या राजकारणात उहोताना दिसत आहेत. महिलांच्या लैंगिक शोषणाच्या गंभीर आरोपांमुळे अटकेत असलेल्या भोंदूबाबाअशोक खरातला न्यायालयाने 24 मार्च 2026 पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्यात येणार आहे.नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याच्याशी संबंध असल्यामुळे रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. विरोधकांच्या तीव्र दबावानंतर त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन पदाचा राजीनामा दिला आहे.
याप्रकरणात आता मंत्री दीपक केसरकरांच्या निकटवर्तीयाची एसआयटीकडून कसून चौकशी केली आहे. यानंतर भोंदूबाबा प्रकरणात तपासात नव्या घडामोडी समोर येत आहेत. दीपक केसरकर यांचे निकटवर्तीय दीपक लोंढे यांची विशेष तपास पथकाकडून कसून चौकशी करण्यात आली आहे. लोंढे आणि भोंदू अशोक खरात यांच्यात काही ठिकाणी व्यावसायिक संबंध असल्याची माहिती मिळाली आहे. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर परिसरात जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारांत लोंढे सक्रिय असल्याची माहिती पुढे आली आहे.
नाशिक पोलीस भोंदूबाबा खरातच्या राजकीय आणि व्यावसायिक भागीदारांपर्यंत पोहचणार आहे. पोलिस पथकाकडून दीपक लोंढे यांची सखोल चौकशी करताना विविध आर्थिक आणि व्यावसायिक व्यवहारांची माहिती मिळाली आहे. या चौकशीतून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे पोलिस भोंदूबाबा अशोक खरातच्या राजकीय आणि व्यावसायिक भागीदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत.
त्यामुळे येत्या काही दिवसांत राज्यात आणखी धक्कादायक राजकीय माहिती मिळण्याची शक्यता आहे. भोंदूबाबा अशोक खरात याच्याविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. नाशिकमध्ये सरकारवाडा पोलिसांत हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अशोक खरात याने एका 35 वर्षीय महिलेवर गुंगीचे औषध देऊन बलात्कार केल्याच्या आरोपाखाली त्याच्यावर कडक कारवाई करण्यात आली आहे.





