देशातील काही मोठ्या शहरांमध्ये १ एप्रिलपासून नवे आयकर नियम लागु होणार; पगारदार कर्मचाऱ्यांना घरभाडे भत्यावर अधिक कर सवलत मिळणार

SHARE:

नवी दिल्ली – देशातील काही मोठ्या शहरांमध्ये १ एप्रिल २०२६ पासून नवे आयकर नियम लागु होणार आहेत, असे केंद्र सरकारने म्हटले आहे. देशात एप्रिल मध्ये नवीन आयकर नियम लागू होणार आहेत. फेक रिसिट आता चालणार नाही. तर आयकर विभागाची नजर राहणार आहे. १ एप्रिल २०२६ पासून लागू होणाऱ्या नव्या आयकर नियमांमुळे मोठ्या शहरांतील पगारदार कर्मचाऱ्यांना घरभाडे भत्यावर अधिक कर सवलत मिळणार आहे. मात्र या सवलतीसाठी पारदर्शक व्यवहार आणि आवश्यक कागदपत्रे ठेवणे अनिवार्य करण्यात आले आहे.

नवे आयकर नियम २०२६ येत्या १  एप्रिल २०२६ पासून लागू होणार आहेत. या नव्या नियमांनुसार देशातील काही मोठ्या शहरांमधील कर्मचाऱ्यांना घरभाडे भत्त्यावर अधिक कर सवलत मिळणार आहे. हे नियम ३१ जुलाई २०२७ रोजी दाखल केल्या जाणाऱ्या इन्कम टॅक्स रिटर्न मध्ये लागू होतील. नव्या नियमांनुसार, मुंबई, दिल्ली, कलकत्ता, दिल्ली, पुणे अहमदाबाद, बेंगलोर, हैदराबाद, या ८ मोठ्या शहरांना अधिक घर भाडे भत्ता कर सवलतीच्या कक्षेत समाविष्ट करण्यात आले आहे.

या शहरांमध्ये राहणार्या पगारदार कर्मचाऱ्यांना आता घर भाडेभत्यावर पूर्वीपेक्षा अधिक कर सवलत मिळू शकेल . नियम २७९ नुसार घर भाडे सत्ता सवलत सर्वात कमी रकमेच्या आधारावर ठरवली जाईल. प्रत्यक्ष भरलेले भाडे वजा पगाराच्या १० टक्केः म्हणजे जेवढे भाडे भरले त्यातून पगाराचे १० टक्के वजा केल्यावर जी रक्कम उरेल ती. पगाराच्या ५० टक्के किंवा ४० टक्के, मोठ्या शहरांसाठी ५० टक्के आणि इतर शहरांसाठी ४०  टक्के इतकी असेल.घर मालकाशी भाडेकरूला नाते सांगावे लागणार आहे.

नव्या नियमांनुसार आता कर्मचाऱ्यांना फॉर्म १२४ मध्ये घर मालकाशी असलेल्या नात्याची माहिती द्यावी लागेल. हा नियम जिथे नातेवाईकांना भाडे दिले जाते, अशा प्रकरणांना लागू होईल. कर तज्ज्ञांच्या मते आई-वडील, आजी-आजोबा किंवा इतर नातेवाईकांना भाडे देता येते. मात्र त्यासाठी व्यवहार पारदर्शक असणे आवश्यक आहे आणि योग्य कागदपत्रे व पुरावे सादर करावे लागतील. बनावट घर भांडे भत्ता दावे रोखणे आणि पारदर्शकता वाढवणे हा सरकारचा उद्देश आहे. करदात्यांनी व लाभ घेणाऱ्या कर्मचाऱ्यांनी काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागणार आहे.

लेखी भाडे करार करावा लागणार आहे, घर मालकासोबत लिखित भाडे करार असणे आवश्यक आहे. बँकेद्वारे भाडे भरावे लागणार आहे. तर भाडे भरताना बँक ट्रान्सफर किंवा चेकचा वापर करावा, रोख रक्कम देणे टाळा. घर मालकाने आयटीआरमध्ये भाडे उत्पन्न दाखवावेः घर मालकाने आपल्या आयकर विवरणपत्रात भाड्याचे उत्पन्न नमूद करणे आवश्यक आहे. १ एप्रिल २०२६ पासून लागू होणारे हे नवे आयकर नियम पगारदार कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचे आहेत.

देशातील मोठ्या शहरांमधील कर्मचाऱ्यांना घरभाडे भत्यावर वर अधिक सवलत मिळणार असली तरी पारदर्शक व्यवहार आणि योग्य कागदपत्रे ठेवणे आता पूर्वीपेक्षा अधिक महत्त्वाचे झाले आहे. त्यामुळे सर्व पगारदार कर्मचाऱ्यांनी वेळीच नव्या नियमांची माहिती करून घेणे आवश्यक आहे.

Leave a Comment

अधिक वाचा