सातारा – जिल्हा परिषदेत सभापती पदाच्या निवडणुकीत, सभापती महिलेस १० कोटी रुपये दिल्याचा आमदार शशिकांत शिंदेंनी गंभीर आरोप केला आहे. सातारा जिल्हा परिषदेत सभापती निवडीवरून मोठा वाद झाला आहे. भाजपने ही फोडाफोडी केली आहे असे आमदार शशिकांत शिंदे म्हणाले आहेत. सातारा जिल्हा प्रशासन यांच्या भूमिकेचा निषेध करत राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या सदस्यांनी सातारा जिल्हा परिषद सभापती निवडीवर बहिष्कार टाकला आहे. सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडीनंतर महायुतीमधील दोन प्रमुख पक्षात चांगलाच वाद झाल्याचे पाहायला मिळाले आहे.
राज्यातील शिवसेना नेते, मंत्री शंभुराज देसाईंनी विधिमंडळात या वादावरुन आक्रमक भूमिका घेतली आहे. तसेच, याप्रकरणी चौकशीचे आदेशही विधानसभा अध्यक्षांकडून देण्यात आले होते. आता, सातारा जिल्हा परिषद सभापती निवडींवरुनही पुन्हा वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, आमदार शशिकांत शिंदे यांनी गंभीर आरोप केला आहे. सातारा जिल्हा परिषद सभापती निवडीत एका सभापतीला १० कोटी रुपये देण्यात आल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, आमदार शशिकांत शिंदे यांनी केला आहे. सातारा जिल्हा परिषद सभापती निवडीवरून जिल्हा परिषदेत मोठ्या गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
सातारा जिल्ह्यात भाजपने केलेली फोडाफोडी आणि सातारा जिल्हा प्रशासनाच्या भूमिकेचा निषेध राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या सदस्यांनी केला आहे. व सातारा जिल्हा परिषद सभापती निवडीवर राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या सदस्यांनी बहिष्कार टाकला आहे. सातारा जिल्हा परिषदेत बहिष्कार, घोषणाबाजी आणि आंदोलनामुळे राजकारण तापले आहे. आता हा सातारा जिल्ह्यातील राजकीय संघर्ष उघडपणे वैयक्तिक वादापर्यत पोहोचला आहे. साताऱा जिल्ह्यात पुन्हा एकदा भाजप विरुद्ध राष्ट्रवादी आणि शिवसेना संघर्ष वाढला आहे. या वादानंतर जिल्ह्यातील राजकीय मंत्री शंभूराज देसाई, मंत्री मकरंद पाटील एका बाजूला आहेत तर, त्यांच्या विरोधात मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंत्री जयकुमार गोरे यांच्यात मोठा वाद वाढल्याचे चित्र सातारा जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.
सातारा जिल्ह्यात लता कर्णे सभापती झाल्या आहेत, त्यांना १० कोटी रुपये त्यांना देण्यात आले आहेत. लोकांना आपण अपात्र होऊ किंवा आपल्यावर पक्ष कारवाई करेल, अशी काही भीती राहिली नाही, असे आमदार शशिकांत शिंदे यांनी म्हटले आहे. आता वाईचे विराज शिंदे यांच्या पत्नी जिल्हा परिषद सदस्य झाल्या आहेत. तर त्यांच्याच घरातील सुरेश जाधव जे काँग्रेसमधील मोठे नेते होते, त्यांनी वैचारिक वारसा जपला नाही, त्यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी एक याचिका दाखल केली आहे, अशी माहिती आमदार शशिकांत शिंदे यांनी दिली आहे. राज्यातील भोंदू अशोक खरात प्रकरणामधील व्हिडिओ क्लिप, सीडीआर बाहेर कसे काय आले? अंजली दमानिया यांच्याकडे सीडीआर कोणी पाठवले असतील? राज्यात जाणीवपूर्वक कुणाला टार्गेट केले जात आहे का? तर सीडीआर प्रकरणी कायदेशीर तपास व्हायला हवा, अशी मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, आमदार शशिकांत शिंदे यांनी केली आहे.





