शेअर बाजारात काय झाले? पुन्हा एकदा गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये बुडाले, राव! ह्या एका कारणामुळे पुन्हा निराशा.

SHARE:

 शेअर बाजार : आखाती युद्धाने शेअर बाजाराची पार कोंडी केलेली आहे. भावनिकतेच्या हिंदोळ्यावर स्टॉक मार्केट गांगारून गेले आहे. आजही सेन्सेक्स आणि निफ्टी ५०  ची सुरुवात घसरणीने झाली. गेल्या काही दिवसांपासून हवसे, नवसे आणि गवसे गुंतवणूकदार बाजाराशी फटकून वागत आहेत. तर ट्रेडर्स मात्र धैर्य बाळगून आहेत.

मंगळवारी भारतीय शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी ५० जवळपास १  टक्क्यांनी घसरले. आखाती युद्धाच्या भीतीने स्टॉक बाजाराची भीतीने गाळण उडाली आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी जवळपास १  टक्क्यांनी घसरला. कच्चा तेल्याची वाढती किंमत आणि परदेशी गुंतवणूकदारांच्या विक्री सत्रामुळे तीन दिवसांच्या तेजीच्या सत्रानंतर बाजार पुन्हा आपटला. सुरुवातीला सेन्सेक्स १.०५ टक्क्यांनी घसरून ७३,३२६.६१  वर आला. तर निफ्टी ०.९  टक्क्यांनी घसरून २२,७७१.७५  अंकावर आला. मोठ्या कंपन्यांसोबतच मिडकॅप आणि स्मॉलकॅप इंडेक्स जवळपास १ टक्क्यांनी घसरला. काही सेकंदातच सूचीबद्ध कंपन्यांचे मूल्य ४.२४ लाख कोटी रुपयांनी घसरले. गुंतवणूकदारांचे जवळपास ४  लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले.

शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या घसरणीमुळे IndiGo, Zomato ची कंपनी Eternal, Mahindra & Mahindra (M&M), State Bank of India (SBI), Axis Bank आणि Asian Paints यांना सर्वात मोठा फटका बसला. या शेअर्समध्ये जवळपास २-३  टक्क्यांची घसरण झाली. तर Bajaj Finance, TechMahindra, HCL Tech आणि ITC शेअरला धक्का लागला नाही. हे शेअर किंचित वधारले.

ऑटो सेक्टरला फटका

NSE वर सेक्टोरल इंडेक्समध्ये Nifty Auto ला सर्वाधिक फटका बसला. सुरुवातीच्या ट्रेडिंगमध्येच हा शेअर २  टक्क्यांहून अधिकने घसरला. जेव्हा Nifty PSU Bank इंडेक्समध्ये १.९ टक्क्यांची घसरण झाली. दरम्यान Nifty Metal मध्ये ०.७ टक्क्यांची वाढ झाली. तर India Vix मध्ये २ टक्क्याची उसळी दिसली. NSE वर जवळपास १,१०५ शेअर घसरले. तर १,३९८ शेअर्स किंचित वधारले. तर ८२ शेअरमध्ये कोणताही बदल दिसला नाही.

या कारणामुळे बाजारात भीतीचे सावट

इराणला ट्रम्प यांनी नव्याने धमकी दिली आहे. अख्खा इराण उद्धवस्त करण्याची धमकी दिली आहे. शेअर बाजाराला केवळ ट्रम्प यांच्या विधानांमुळेच गेल्या काही दिवसात मोठा फटका बसल्याचे दिसून येत आहे. ट्रम्प यांच्या एका विधानाचा बाजारातील घडामोडींवर मोठा परिणाम होतो. त्यात युद्धज्वर चढल्याने ते सातत्याने विविध वक्तव्य करतात. त्यामुळे विविध क्षेत्रातील कंपन्यांवर आणि गुंतवणूकदारांवर परिणाम होतो.

बाजारात इंधन तेलाच्या वाढत्या किंमतींचाही परिणाम दिसून आला. इंधनाच्या किंमती ११० डॉलर प्रति बॅरलवर पोहचल्या. होर्मुझ समुद्रधुनीतून होणारी जलवाहतूक प्रभावित झाल्याने अनेक देशांवर इंधन संकट निर्माण झाले आहे. तेलाच्या किंमती भडकल्यानेही बाजारात त्याची प्रतिक्रिया उमटली.

Leave a Comment

अधिक वाचा