सकाळ सकाळी नको असलेलेच घडले! सामान्य माणसांना सोन्याचा मोठा ধাক্কা, काही तासांमध्येच सोन्याची किंमत…

SHARE:

व्यवसाय : अमेरिका-इस्रायलचं इराणशी युद्ध सुरू असताना सोन्याच भाव बरेच खाली घसरले होते. जागतिक अशांतता, अस्थिरता यामुळे सोनं-चांदीच्या दरात सतत चढउतार सुरू होती. मात्र काल युद्धविरामाची घोषणा झाल्यापासून सोनं-चांदीने सर्रकन वर झेप घेतली आहे. गुरूवारी सकाळी बाजार उघडल्यावर सोन्याचे दर…

२८ फेब्रुवारीला अमेरिका-इस्रायलने मिळून इराणवर हल्ला चढवला आणि जोरदार युद्धाला तोंड फुटलं. गेल्या ४० दिवसांपासून हा संघर्ष सुरू होता, ज्यामुळे जगात अशांतता होती, जागतिक बाजारावर, आर्थिक क्षेत्रावरही याचे परिणाम दिसून येत होते. या युद्धाच्या झळा बसत असलाने सोनं-चांदीचे दरही सातत्याने वरखाली होत होते, गुंतवणूकदारांसाठी फारसे चांगले दिवस दिसत नव्हते. गेल्या काही काळापासून सोन्याचे भाव सतत घसरत होते, मात्र काल अमेरिका-इराणने एकेक पाऊल पुढे टाकत युद्धविरामाची घोषणा केली आणि क्षणात सगळं चित्र पलटलं. अवघ्या काही तासांतच सोन्याचे भाव सर्रकन वर गेले आणि सर्वसामान्यांना मोठा झटका बसला.

सोन्याच्या दरातील ही तेजी आजही कायम असून गुरावर, ९  एप्रिल रोजीची सोन्याच्या भावात वाढ झालेली दिसत आहे. जागतिक स्तरावर सोनं वाढलं, त्याचे परिणाम देशांतर्गतही दिसून आले असून भारतात सोन्याच्या किंमती वाढल्या आहेत. ९ एप्रिलच्या सकाळी, राजधानी दिल्लीत २४-कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,५३,९८० रुपयांवर पोहोचला. मुंबईत हा भाव प्रति १० ग्रॅम १,५३,८३० रुपये इतका आहे. म्हणजेच मुंबईपेक्षा दिल्लीत २४ कॅरेट सोनं हे १५० रुपयांनी महाग आहे. आदल्या दिवशी, म्हणजे कालच (बुधवारी) दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव ३२०० रुपयांनी, म्हणजेच २.०९ टक्क्यांनी वाढून प्रति १० ग्रॅम १,५६,४०० रुपयांवर पोहोचला होता. अमेरिका आणि इराण यांच्यात युद्धविराम होण्याची शक्यता हे सराफा बाजारातील दरवाढीचे एक प्रमुख कारण आहे.

सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट सोन्याचा भाव सध्या प्रति औंस ४,८०३.३३  डॉलर्स इतका आहे. देशांतर्गत सोने आणि चांदीच्या किमतींवर देशांतर्गत आणि जागतिक अशा दोन्ही घटकांचा प्रभाव पडतो.

देशातील महत्वाच्या शहरातील सोन्याचे दर

राजधानी दिल्लीमध्ये दिल्लीमध्ये २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,५३,९८० आहे, तर २२ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १०  ग्रॅम १,४१,१६०  रुपये आहे. तर मुंबई आणि कलकतत्ता आहे, २४ कॅरेटचं १० ग्रॅम सोनं खरेदी करण्यासाठी १,५३,८३० रुपये आणि २२ कॅरेटचं १० ग्रॅम सोनं खरेदी करण्यासाठी १,४१,०१० रुपये मोजावे लागत आहेत.

तसेच चेनन्नईमध्ये २४ कॅरेट सोन्याची किंमत ही सर्वाधिक म्हणजेच १,५४,९२० रुपये तर २२ कॅरेटच्या १० ग्रॅम, अर्थात १  तोळा सोन्याची किंमत ही १,४२,०१० रुपये आहे. पुणे आणि बंगळूरुमधील या दोन्ही शहरांमध्ये, २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम १,५३,८३०  रुपये आणि २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम १,४१,०१० रुपये आहे.

चांदीचे दर

सोन्याप्रमाणेच चांदी या मौल्यवाने धातूनेही आज मागे वळून पाहिलेलं नाही. चांदीच्या दरातही वाढ होत आहे. ९ एप्रिलच्या सकाळी, चांदीचे दर प्रति किलोग्राम २,६०,१०० रुपयांपर्यंत वाढला. आदल्या दिवशी, दिल्ली सराफा बाजारात चांदीचा दर ११,०० रुपयांनी, म्हणजेच सुमारे ५  टक्क्यांनी वाढून, प्रति किलोग्राम २,५१,००० रुपयांवर पोहोचला होता. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचा स्पॉट भाव प्रति औंस ७७.३३ डॉलर आहे. या वर्षी जानेवारी महिन्यात देशात चांदीच्या दराने ४  लाख रुपयांचा टप्पा ओलांडला होता.

Leave a Comment

अधिक वाचा