छत्रपती शिवाजी महाराजांनी सन्मान केल्यामुळे स्त्रिया आज ठामपणे उभ्या आहेत; शिरूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा ऐश्वर्याताई पाचरणे यांचे प्रतिपादन

SHARE:

पुणे – छत्रपती शिवाजी महाराजांनी सन्मान केल्यामुळे स्त्रीया आज ठामपणे उभ्या आहेत, असे प्रतिपादन शिरूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा ऐश्वर्याताई पाचरणे यांनी बुधवारी केले. त्या शिरूर येथे भारत मुक्ती मोचा, छत्रपती क्रांती सेना या संघटनेच्या माध्यमातून आयोजित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिनी एका कार्यक्रमात बोलत होत्या.

ऐश्वर्याताई पाचरणे पुढे म्हणाल्या कि महापुरूषांबद्दल बोलायचं झालं तर प्रत्येक वेळी आपन सर्वांच्या जयंत्या आणि पुण्यतिथी साजरी करतो. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतीराव फुले या सगळ्यांबद्दल बोलायचं झाल तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यामधून शिकण्यासारखं खूप काही आहे. आपण भाषणातून त्यांचे मनोगत व्यक्त करतो. पण आपन त्यांच्याकडून खरचं धडा घेतो का? धडा घेताना प्रश्न उरतो कि खरच आपन रोज स्वतःला प्रश्न करतो का? आपन जो इतिहास शिकलो त्याप्रमाणे आपन वागतो का? जसं कि आपन म्हणतो कि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात महिला इतिक्या प्रमाणात सुरक्षित होत्या कि त्यांना माहित होतं कि आपन सेफ फिल करतो. भारतात आणि महाराष्ट्रात सध्याची परिस्थिती वेगळी आहे.

परंतू आपल्या शिरूरमध्ये अशी वेळ आलेली नाही आहे. येथील जनता फार सौजन्य आहे. येथे जाती-पाती धर्म बघितला जात नाही. सर्व एकोप्याने काम करतात. शिरूर महानगर पालिकेत काम करताना एकच सर्व पक्ष विसरून आम्ही काम करतो. आदरणीय अजितदादा पवार आपल्यासोबत नसले तरी त्यांच्याकडून काही शिकण्यासारखं असतात. ते काही शिकत गेले. आपले आमदार कटके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मी उभी होते. त्यांच्याकडून प्रचाराच्या दरम्यान १० ते ११ दिवसात शिकण्यासारखं भरपूर काही होतं. ते म्हणजे जनतेसोबत कसं जुळायचं. सामान्य जनतेच्या समस्यांचं कसं समाधान करायचं, असं शिरूरच्या नगरराध्यक्ष म्हणाल्या.

त्या म्हणाल्या कि आता १४ एप्रिल रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. त्यामध्ये आपन सगळे भेटू. त्यांच्याकडून शिकण्यासारखं बरेचं काही आहे. तो म्हणजे अभ्यास करायचा, पण एकनिष्ठ होऊन केला पाहिजे, हे त्यांनी आपल्याला शिकवून दिलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवलं आहे कि फक्त काम करण्याची पद्धत ही एकनिष्टतेने पाहिजे. कायम पाहिजे. रोज स्त्रीयांचा सनमान कसा केला पाहिजे. आपन आपल्या लोकांना कसं एकोप्याने ठेवलं पाहिजे. जसे की त्या काळात ज्यॉइंट फॅमिली असायची. जेव्हा एकत्र कुटुंब असते तेव्हा त्या कुटुंबाला आधार मोठा मिळतो आणि तिथून लोकं पुढे जातात.

पाचरणे ताई म्हणाल्या कि आपलंही तसंच आहे. जसी शिवाजी महाराजांना त्यांच्या काळात मावळ्यांची साथ लाभली. त्यांच्यामुळं आज आपन महाराष्ट्रात उभं आहो. आज आपल्या दारात जी तुळस आहे, ती महाराजांमुळं आहे. ते म्हणजे आज महिला तुळसला पाणी घालू शकतं. शिवाजी महाराजांनी सन्मान केल्यामुळे स्त्रीया आज ठामपणे उभ्या आहेत. त्यांच्यामुळेच आज स्त्रिया राष्ट्रपती आणि उपमुख्यमंत्री आहेत. मी शिरूरची नगरराध्यक्ष आहे. आम्ही १३ जणी नगरपालिकेच्या बॉडीमध्ये आहोत. मी सर्वांना सांगेण कि स्त्रियांना साथ द्या, सर्व एकोप्याने राहू या. शिरून नगरपालिकेच्या मार्फत तुम्हाला काहीही अडचण आली तर तुम्ही मोकळेपणाने आमच्याकडे या.

महापुरूषांनी आपल्याला जी शिकवण दिली, त्यातूनच आपन संस्कार घडवले पाहिजेत. आपल्या मुलांना घडवलं पाहिजे. इथून पुढच्या पिढीला जसे कि राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं, छत्रपती संभाजी महाराजांना घडवलं, तितकं नाही पण त्यांच्यातलं थोडं शिकवन घेऊन थोडं वळन घेऊन आपल्या मुलांना शिकवलं तर आपली मुलं निश्चितंच पुढे जातील. आपल्या मुलांना अभ्यास करा, अस म्हणण्यापेक्षा अभ्यास का केला पाहिजे, अधिकारी, डॉक्टर, इंजिनिअर का बनलं पाहिजे. असं सांगितलं पाहिजे. आताच्या काळात असं नाही कि इंजिनिअरच्या मुलगा इंजिनिअरचं बनेल. आता जनता एवढी सौजन्य झाली आहे कि ते मुलानां गायडंस देऊ शकतात की तु डॉक्टर हो. मुलांना सांगा कि अभ्यास केला तर हे जड नाही. तुम्ही आई-वडिलांचं नाव मोठं करू शकता. हे करत असताना मुलांवर दबाव न देता हे केलं पाहिजे, असं त्यांनी सांगितलं.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात संभाजी महाराज घडले. कारण त्यांना शिवाजी महाराजांची साथ होती. शिवाजी महाराजांनी लहान वयापासूनच त्यांना धडे शिकवले. छत्रपती संभाजी महाराजांबद्दल बोलायचं झाल तर एवढ्या लहान वयात त्यांच्यासारखा धाडसी कोणी नसेल. सर्व भारतामधून मोजलं तरी त्यांच्याएवढा कोणी नसेल. छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकण्यासारख आहे कि अन्यायाविरूद्ध कसं उभं राहावं, असंही पाचरणे यांनी आवर्जून सांगितलं.

Leave a Comment

अधिक वाचा