बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत २३ जण निवडणुकीच्या रिंगणात; काँग्रेसचे आकाश मोरे यांच्यासह 30 उमेदवारांचे अर्ज मागे

SHARE:

पुणे – बारामती विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत २३ जण निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत, तर काँग्रेससह 30 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. बारामतीत शेवटच्या दिवशी काँग्रेससह ३० उमेदवारांनी विधानसभा पोटनिवडणुकीत अर्ज मागे घेतले आहेत. आणि बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत अभिजीत बिचुकले व करुणा शर्मा हे ही निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांनी उमदवारी अर्ज माघारी घेतला नाही. बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अर्ज माघारी घेत असल्याची घोषणा केली आहे.

यावेळी, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी फोन करुन विनंती केल्याची माहिती मिळाली आहे. तसेच आमदार रोहित पवार यांनी देखील हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेतल्याची माहिती दिली आहे. तसेच, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी देखील हर्षवर्धन सपकाळ यांना सूचना केल्याचे उल्लेख करत हर्षवर्धन सपकाळ यांनी काँग्रेसने निवडणुकीत माघार घेतल्याची माहिती दिली आहे. यावेळी, त्यांनी पार्थ पवारांच्या वक्तव्यावरुन राष्ट्रवादी अजित पवार गटावर टीका केली आहे. बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची वेळ आता संपली आहे.

बारामतीतील विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांनीही आपला अर्ज माघारी घेतला आहे. त्यामुळे, बारामती विधानसभा मतदारसंघातील अर्ज दाखल केलेल्या ५५  पैकी एकूण ३० उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. मात्र, बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले आणि करुणा शर्मा यांचा अर्ज कायम आहे. त्यामुळे, बारामती पोटनिवडणुकीत एकूण २३ जण निवडणुकीच्या रिंगणात उमदवार उभे आहेत. गुरुवारी ६ जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले होते, त्यानंतर आज २४ उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले आहेत. त्यामुळे बारामती विधानसभा मतदार संघातील पेटनिवडणुकीतून एकूण ३० उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले आहेत.

बारामती विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी अभिजीत बिचुकले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तसेच करुणा शर्मा यांनी देखील बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरला होता. त्यामुळे, काँग्रेसने माघार घेतल्यानंतर या दोघांच्या अर्जाकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र, अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी दोघेही बारामतीत फिरकले नाहीत. त्यामुळे, अभिजीत बिचुकले आणि करुणा शर्मा यांचे अर्ज कायम राहिले आहेत.

आता बारामती विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार असल्याचे निश्चित झाले आहे. बारामतीत २३ एप्रिल २०२६ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. राज्यात बारामती आणि राहुरीचा पोटनिवडणूक कार्यक्रमाची अधिसूचना ३० मार्च २०२६ रोजी जाहीर करण्यात आली आहे. तर बारामती विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी ही ४ मे २०२६ रोजी होणार आहे, आणि बारामती पोटनिवडणुकीची निवडणुक प्रक्रिया ६ मे २०२६ रोजी पुर्ण होणार आहे.

Leave a Comment

अधिक वाचा