भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे दुसरा अशोक खरात; आमदार संजय गायकवाड यांचा गंभीर आरोप

SHARE:

बुलढाणा – भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली. एसआयटीच्या तपासातून अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. या दरम्यान शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी एका भाजप नेत्यावर गंभीर आरोप केले आहेत. बुलढाण्याचे भाजप जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार विजयराज शिंदे हा दुसरा भोंदू अशोक खरात आहे. त्याने त्याच्या शाळेत शिकत असलेल्या कितीतरी पोरी त्याने बरबाद केल्या. असा गंभीर आरोप आमदार संजय गायकवाड यांनी विजय शिंदे यांच्यावर केला आहे. या आरोपाने जिल्हयातील राजकीय पारा तापला आहे.

बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी बुलढाण्याचेच माजी आमदार व सध्या भाजपा जिल्हाध्यक्ष असलेले विजयराज शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केलेत. ते म्हणाले कि विजयराज शिंदे यांच्या निवासी शाळा (आश्रमशाळा) मध्ये शिकणाऱ्या अनेक विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केले गेले आहेत. शिंदे यांनी अनेक मुलींचे आयुष्य बरबाद केले असून, त्यांच्या इज्जती लुटल्या आहेत. शिंदे यांच्या शाळेतील काही महिला कर्मचारी या प्रकारात मध्यस्थी करत असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणाच्या चौकशीची त्यांनी मागणी केली आहे. याशिवाय त्यांनी विजयराज शिंदेंवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करावा किंवा त्यांच्या शाळेत शिकणाऱ्या आजी-माजी विद्यार्थिनींची व त्यांच्या पालकांची माफी मागावी, असेही म्हटले आहे.

मात्र भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी गायकवाड यांच्या आरोपांना जोरदार खंडन केले आहे. त्यांनी या वक्तव्याला ‘चोराच्या उलट्या बोंबा’ असे म्हटले आहे. शिंदे यांनी यापूर्वी नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची चौकशी व्हावी, असे विधान केले होते, ज्यावरून हा पलटवार झाला असल्याचे दिसते.

Leave a Comment

अधिक वाचा