खरात प्रकरणात नाशिक व अहिल्यानगरमधील बांधकाम व्यावसायिकांची चौकशी होणार; १७ कोटींचे बेकायदेशीर व्यवहार झाल्याची माहिती उघड

SHARE:

अहिल्यानगर – खरात प्रकरणात नाशिक व अहिल्यानगरमधील बांधकाम व्यावसायिकांची चौकशी होणार आहे, तर १७ कोटींचे बेकायदेशीर व्यवहार झाल्याची माहिती उघड झाली आहे. भोंदू अशोक खरात प्रकरणात आता नवा खुलासा समोर आला आहे. नाशिक व अहिल्यानगर येथे जमीन खरेदीसाठी नॅशनल बँकेचा वापर करण्यात आला आहे. तर आर्थिक व्यवहारातील भागीदारांचीही नाशिक व अहिल्यानगर एसआयटीकडून चौकशी होणार आहे. भोंदूगिरी आणि फसवणुकीच्या प्रकरणात अशोक खरात प्रकरणी नवीन माहिती मिळाली आहे. अलीकडेच त्याचा नॅशनल बँकेसंबंधी अशोक खरातचा नवा कारनामा उघडकीस आला आहे.

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याला चौथ्या गुन्ह्याप्रकरणी १८ एप्रिल २०२६ पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. तर भोंदु अशोक खरातच्या चौकशीत अद्याप महत्त्वाच्या मुद्द्यांवर तपास सुरू आहे. महिलांचे शोषण करणाऱ्या अशोक खरातने अनेक व्यावसायिक तसेच सर्वसामान्य नागरिकांनाही फसवले आहे. त्याचा नॅशनल बँकेसंबंधी नवा कारनामा समोर आला आहे. यामुळे अशोक खरातवर आता आणखी गुन्हे दाखल झाल्याचे दिसून येत आहे. अशोक खरात प्रकरणातील आर्थिक व्यवहारातील सर्व भागीदारांची आता कायदेशीर एसआयटी पथकाकडून चौकशी होणार आहे.

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आर्थिक व्यवहारातील भागीदारांच्याही आता अडचणी वाढल्या आहेत. नाशिकसह अहिल्यानगर जिल्ह्यातील विकासक आणि बांधकाम व्यावसायिकांची एसआयटीकडून आता चौकशी केली जाणार आहे. अशोक खरातच्या आर्थिक व्यवहारात मोठे बांधकाम व्यावसायिक सहभागी असल्याची तपास यंत्रणेला माहिती मिळाली आहे. यात भोंदू अशोक खरात भक्तांकडून श्रद्धेच्या नावावर लाखो रुपये घेत असल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली आहे. त्या दिशेने एसआयटीचा तपास सुरु आहे. अशोक खरातची एसआयटी पथकाकडून आर्थिक व्यवहार आणि मालमत्तेतील सर्व भागीदारांची माहिती गोळा करत आहे.

अशोक खरातची चौथ्या गुन्ह्यात १८ एप्रिल २०२६ पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. तपासातून आणखी काही धक्कादायक माहिती येण्याची शक्यता आहे. नॅशनल बँकेतील बरीच खाती कल्पना खरातच्या नावावर आहेत. भक्तांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत भोंदू अशोक खरातने अनेक ठिकाणी जमीन खरेदी केल्या आहेत. यांपैकी काही एकर जमीन त्याने अहिल्यानगरमधील शिर्डी येथे खरेदी केल्याची माहिती मिळाली आहे.

भोंदू अशोक खरातची खरेदी केलेली बेकायदेशीर सगळी जमीन एकूण १२ एकर असल्याचे समोर आले आहे. भोंदू अशोक खरातने खरेदी केलेल्या ४ एकर जमीनीसाठी नॅशनल बँक खात्यांचा वापर करण्यात आला आहे. नॅशनल बँकेतील कल्पना खरातच्या नावावरील संबंधित खात्यांमधून १७ कोटींचे बेकायदेशीर व्यवहार झाल्याची माहिती उघड झाली आहे. पोलीस यंत्रणांच्या चौकशीत बरीच माहिती उघडकीस येण्याची शक्यता आहे. या प्रकरणात अधिक तपास अहिल्यानगर व नाशिक पोलिस करत आहेत.

Leave a Comment

अधिक वाचा