‘तुम्हाला तुमचं स्वत:च कळत नाही, पण तुमच्या सोबत भाजपला..’ या प्रश्नावर अजित पवार यांच्या सख्ख्या भावांचं परखड मत।

SHARE:

बारामती  : आज बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांचे सख्खे बंधु श्रीनिवास पवार टीव्ही ९ मराठीशी बोलले. त्यांनी पवार कुटुंबातील राजकीय स्पर्धा, २०२९ मध्ये काय होणार यावर परखडपणे आपलं मत मांडलं.

आज बारामती विधानसभेची पोटनिवडणूक होत आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्या विजयासाठी पवार कुटुंब ताकदीने मैदानात उतरलं आहे. जिंकण्यापेक्षा किती मताधिक्क्याने विजय होणार ते महत्वाचं आहे. अजितदादा यांच्या अकाली जाण्याने बारामती मतदारसंघात एक सहानुभूतीची लाट आहे. २८ जानेवारीला विमान अपघातात अजित पवार यांचं बारामती येथे निधन झालं. सुनेत्रा पवार राष्ट्रवादी, महायुतीच्या उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रीनिवास पवार बोलले. ते अजित पवार यांचे सख्खे बंधु आहेत.

२०२९ मध्ये बारामती विधानसभेचं चित्र काय असेल? पवार विरुद्ध पवार सामना होईल का? यावर ‘काळ सांगेल काय होतयं ते’ असं उत्तर त्यांनी दिलं. युगेंद्र पवार यांचं म्हणणं आहे की, कार्यकर्त्यांची अशी इच्छा आहे की, या भागातून मी २०२९ मध्ये उमेदवारी करावी यावर श्रीनिवास पवार यांनी ‘ज्यांचे कार्यकर्ते असतात, त्यांना वाटतं आपल्या नेत्याने पुढचं पाऊल टाकलं पाहिजे’ असं श्रीनिवास पवार यांनी उत्तर दिलं.

हे आत्ता सांगणं अवघड आहे

२०२९ ला पवार विरुद्ध पवार सामना होऊ शकतो का? जे लोकसभेला, विधानसभेला दिसलं. “पुन्हा फिरवून, फिरवून तुम्ही तोच प्रश्न विचारताय. २०२९ ला नक्की काय चित्र असेल, हे आत्ता सांगणं अवघड आहे. दादांचं असं अचानक जाणं होईल हे आपल्याला २७ जानेवारीपर्यंत कुठे माहित होतं. तीन वर्षात काय होईल? सगळे पक्ष वेगळे लढतील का? युती होईल का? दोघे एकत्र होतील का? असे सगळे क्वेशनमार्कवाले प्रश्न आहेत. वहिनींना आता दोन-तीन महिने झालेत. सेटल व्हायला वेळ लागेल. सेटल झाल्यावर त्यांची मत बदलतील की ठाम होतील? दोन्ही होऊ शकतं” असं श्रीनिवास पवार म्हणाले.

भाजपला बदनाम करण्यात काय उपयोग?

भाजप अशा पद्धतीने पवार कुटुंबात राजकारण लावून देतय का? यावर श्रीनिवास पवार यांनी “भाजपला बदनाम करण्यात काय उपयोग? तुम्हाला तुमचं स्वत:च कळत नाही. पवार कुटुंब राजकारणातलं एवढं जुनं कुटुंब आहे. तुम्हाला ते समजलं पाहिजे” असं श्रीनिवास पवार म्हणाले.

Leave a Comment

अधिक वाचा