पंडित धीरेंद्र गर्गकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान; महाराष्ट्रात वातावरण तापल, पुण्यात जोडेमार आंदोलन

SHARE:

नागपूर – छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांची कधीही भेट झाली नाही. रामदास स्वामी यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी कधीही भेट झाली नाही. रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू नव्हते, असा निकाल मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे. यानंतरही बागेश्वर धामचे स्वयंघोषित साधू पंडित धीरेंद्र शास्त्री उर्फ धीरेंद्र गर्ग याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत अवमान करणारं वक्तव्य केलं. यावरून संपूर्ण राज्यात वातावरण तापलं आहे. विरोधी पक्षांसह शिवप्रेमींनी धीरेंद्र शास्त्रीवर कारवाईची मागणी केली आहे. तर काहीहीं त्यांच्या महाराष्ट्र बंदीची मागणी केली आहे. धीरेंद्र शास्त्रीने छत्रपती शिवाजी महाराजांबाबत अवमानजनक वक्तव्य केल्याने पुण्यातील लाल महालाजवळ मराठा समूदायाकडून धीरेंद्र शास्त्रीच्या फोटोला जोडेमार आंदोलन करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज अनेक लढाया लढून थकले होते. त्यानंतर ते समर्थ रामदास स्वामींकडे गेले आणि त्यांनी आपली सत्ता (राजपाट) रामदास स्वामींना सोपवली. शिवराय म्हणाले की आता मला लढायचे नाही, हे मुकूट आणि सत्ता तुम्ही सांभाळा. नागपूरमधील आरएसएसच्या एका कार्यक्रमात धीरेंद्र शास्त्रींनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत असं अवमानजनक वक्तव्य केलं. यावेळी मंचावर आरएसएस प्रमुख मोहन भागवत, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पंडित देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्याने महाराष्ट्रात मोठा राजकीय आणि सामाजिक वाद निर्माण झाला असून राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातून धीरेंद्र शास्त्री यांचा धिक्कार केला जात आहे.

धिरेंद्र शास्त्री यांच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद फडणवीस म्हणाले कि धीरेंद्र शास्त्रींच्या दाव्याला पाठिंबा देणारा कोणताही ऐतिहासिक पुरावा महाराष्ट्रात उपलब्ध नाही. मात्र जेव्हा धीरेंद्र शास्त्रीने छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणारं वक्तव्य केलं तेव्हा त्यांना रोखायचं होतं. असं मात्र त्यांनी केलं नाही.
महाराष्ट्रात येऊन शिवरायांचा अवमान करणाऱ्या आणि इतर महापुरूषांबाबत बिनबुडाची वक्तव्य करणाऱ्या या बाबांना अद्दल घडवायलाच हवी, अशी तीव्र प्रतिक्रिया शिवप्रेमींतून उमटत आहे. धीरेंद्र शास्त्रीच्या या अवमानजनक वक्तव्यानंतर पुण्यातील लालमहाल जवळ मराठा समूदायाने धीरेंद्र शास्त्रीच्या फोटोला जोडेमार आंदोलन करून कारवाईची मागणी केली.

महाराष्ट्रातील विरोधी पक्ष आणि शिवप्रेमींनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास चुकीच्या पद्धतीने सादर केल्याचा आरोप करत इतिहासकार आणि विरोधी नेत्यांनी या विधानावर आक्षेप घेतला आहे. माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी धीरेंद्र शास्त्री यांच्या या वक्तव्याचा समाचार घेतला. बाबा बुवांनी अध्यात्म सांगावं, मनाला वाटेल तसा इतिहास सांगू नये असं संभाजीराजे म्हणाले. तसचे अध्यात्म आणि इतिहास यांची सरमिसळ करून त्याची अहवेलना करू नये असंही ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनीही, शिवाजी महाराजांच्या इतिहासाची मोडतोड महाराष्ट्र सहन करणार नाही, असे ठणकावून सांगितले. बागेश्वर बाबांवर महाराष्ट्रात बंदी घाला अशी मागणी आमदार अमोल मिटकरी यांनी केली.

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी या विधानाला ऐतिहासिकदृष्ट्या चुकीचे आणि शिवरायांच्या वारशाचा अपमान करणारे म्हटले आहे. त्यांनी शास्त्रींवर कारवाईची आणि अटकेची मागणी केली आहे. इतिहास अभ्याकांनी बागेश्वर बाबांच्या विधानाला भाकडकथा म्हटलं आहे. विरोधकांनी असा आरोप केला आहे की, भाजप आणि आरएसएसकडून जाणीवपूर्वक चुकीचा इतिहास पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. या विधानामुळे महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापले असून, अशा प्रकारे इतिहासाचे विकृतीकरण खपवून न घेण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Leave a Comment