मुंबईमध्ये NCB ने मोठी कारवाई करत १७४५ कोटी रुपयांचे कोकेन जप्त केले. अमित शाह यांनी टीमचे अभिनंदन केले आहे.

SHARE:

मुंबई – आरोपी महिला पुण्याची राहणारी आहे. मुंबई आणि महाराष्ट्रात पसरलेल्या एका मोठ्या ड्रग रॅकेटमधील ती एक महत्वाचा दुवा असू शकते. पोलिसांनी अश्विनीला टिटवाळ्याच्या पद्मावती रॉयल्स सोसायटीमधून अटक केली.

देशाची आर्थिक राजधानी मुंबईत कोकीनचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. नार्कोटिक्‍स कंट्रोल ब्‍युरोच्या टीमने मिळालेल्या टीपच्या आधारावर ही कारवाई केली. ३४९ किलोग्रॅम कोकीन जप्त केलं. NCB ने जप्त केलेल्या या कोकीनची बाजारातील अंदाजित किंमत १७७५ कोटी आहे. नशेच्या पदार्थाचा इतका मोठा साठा कुठून आला? कोणी आणला? कुठे जाणार होता? हा तपासाचा विषय आहे. कोकीनचा एवढा मोठा साठा पकडल्याने NCB ची टीम सुद्धा चक्रावून गेली आहे. कोकीन जप्तीसह आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश केल्याचा दावा एनसीबीने केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या कारवाईसाठी NCB ला शुभेच्छा दिल्या आहेत.

NCB च्या या यशाबद्दल अमित शाह यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. नशा तस्करी विरोधात कठोर कारवाई सुरु ठेवण्याचा संकल्प बोलून दाखवलाय. त्यांनी एक्सवर लिहिलय की, एनसीबीने मुंबईत मोठी कारवाई केली. ३४९ किलो हायग्रेड कोकीन जप्त केलं. ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत १७४५ कोटी रुपये आहे. हे ऑपरेशन म्हणजे एजन्सीच्या बॉटम टू टॉप अप्रोचच उदहाण आहे. सरकार ड्रग कार्टेलला मूळापासून संपवण्यासाठी कटिबद्ध असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

पद्मावती रॉयल्स सोसायटीमधून अटक

याआधी मुंबई पोलिसांनी ड्रग तस्करी विरोधात मोठी कारवाई करताना एका पूर्व बार डान्सरला अटक केली होती. पोलिसांनी आरोपीकडून जवळपास ६ कोटी रुपयांच्या ५,००० एमडीएमए (एक्स्टेसी) गोळ्या जप्त केल्या होत्या. अश्विनी पॉल असं अटक केलेल्या महिलेचं नाव आहे. आरोपी महिला पुण्याची राहणारी आहे. मुंबई आणि महाराष्ट्रात पसरलेल्या एका मोठ्या ड्रग रॅकेटमधील ती एक महत्वाचा दुवा असू शकते. पोलिसांनी अश्विनीला टिटवाळ्याच्या पद्मावती रॉयल्स सोसायटीमधून अटक केली. छापेमारी दरम्यान पाच मोबाइल फोन आणि आठ सीम कार्ड पोलिसांनी जप्त केले आहेत. जोडीदार तुरुंगात गेल्यानंतर अश्विनीची या ड्रग व्यवसायात एन्ट्री झाल्याचं प्राथमिक तपासातून समोर आलय.

त्यांच्याकडे २०० गोळ्या सापडलेल्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अश्विनीने २०१२ साली मुंबईत येऊन डान्स बारमध्ये काम सुरु केलं. वेळेबरोबर तिने पार्टीत ड्रग सप्लाय करायला सुरुवात केली. हळूहळू तिचं नेटवर्क मुंबईसह महाराष्ट्रतील अन्य शहरात पसरलं. खासकरुन कॉलेजला जाणारी मुलं तिच्या रडारवर असायची. एका गोळीसाठी ती १५०० ते २००० रुपये घ्यायची. या प्रकरणात पोलिसांनी साकीनाका भागातून इरफान अन्सारी आणि सूफियान या दोन आरोपींना अटक केली होती. त्यांच्याकडे २०० गोळ्या सापडलेल्या. त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारेच पोलीस अश्विनीपर्यंत पोहोचले.

Leave a Comment