महान क्रांतिकारी शहीद कर्तारसिंग सराभा यांना क्रांतिकारी अभिवादन; नवजागरण मनिषी व क्रांतिकारी स्मरण समिती, अमरावती चे आयोजन

SHARE:

अमरावती : नवजागरण मनिषी व क्रांतिकारी स्मरण समिती, अमरावती यांच्या वतीने भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील महान क्रांतिकारी शहीद कर्तारसिंग सराभा यांच्या जयंतीनिमित्त माल्यार्पण व पुष्पार्पण कार्यक्रम अत्यंत मर्यादापूर्वक व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. महावीर नगर येथे सकाळी ९ वाजता आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी कर्तारसिंग सराभा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून क्रांतिकारी विचारांना अभिवादन केले.

यावेळी वक्त्यांनी आपल्या मनोगतातून कर्तारसिंग सराभा यांच्या अल्पवयात केलेल्या देशसेवेचा, त्यागाचा व बलिदानाचा गौरवपूर्ण इतिहास उपस्थितांसमोर मांडला. भारताच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी दिलेले योगदान हे युवा पिढीसाठी प्रेरणादायी असून अन्याय, गुलामगिरी व शोषणाविरुद्ध संघर्ष करण्याची प्रेरणा त्यांच्या जीवनातून मिळते, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

कार्यक्रमादरम्यान “इंकलाब जिंदाबाद”, “महान क्रांतिकारी कर्तारसिंग सराभा जिंदाबाद”, “कर्तारसिंग सराभा के विचारों को गांव-शहर में फैला दो”, “क्रांतिकारियों के जीवनचरित्र से छात्र-नौजवान सीख लें” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. तसेच क्रांतिकारकांचे विचार समाजाच्या प्रत्येक स्तरापर्यंत पोहोचविण्यासाठी सामाजिक, वैचारिक व जनजागृतीपर उपक्रम सातत्याने राबविण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला.

या प्रसंगी समितीचे सन्माननीय गणेश मुंधरे, सतीश ढोरे, प्रियंका मुंधरे, निलू दास, किशोर पेंढारकर, विक्रांत सातारकर, माही वानखडे, ओम चेडे, स्वरा साबे, वीरा हनवते, मसिरा शेरखान, भावेश चाफले, कृष्णाई ठाकरे, हिमांशू चरपे, श्रेयांश कोराम, लोकेश डहाके, ईश्वरी डगवार, धवल तेली, श्रेयांश्री डहाके, कौतुक चोरे, ईश्वरी हटवार, प्रिन्स बिजवे, कार्तिक तेली, आराध्या मंडाले, गौरी बिलगये, अनघा बिजवे, नित्या आखरे, त्रीउषा लवाडे, गणेश आखरे व निधी कोराम उपस्थित होते. कार्यक्रम शिस्तबद्ध, उत्साहपूर्ण व क्रांतिकारी वातावरणात पार पडला.

विवेक गंगाधरराव राऊत
Author: विवेक गंगाधरराव राऊत

Cheif Editor, Rayat Rakshak News, Maharashtra.

Leave a Comment