नीट पेपरफुटीचे धागेदोरे उलगडले; सीबीआयची मोठी कारवाई, दोन आरोपींना ठोकल्या बेड्या!

SHARE:

पुणे – नीट पेपरफुटी प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. सीबीआयकडून डॉ. मनोज शिरुरे व तेजस शाह या 2 आरोपींना अटक केली आहे. पुण्यातून सीबीआयने दोघांना अटक केली आहे. यामुळे या प्रकरणातील आरोपींची संख्या आता 13 वर पोहोचली आहे. अटकेतील 2 आरोपींमध्ये नीट पेपरफुटीतील कथित गॉडचा समावेश आहे. देशात खळबळ उडवून देणाऱ्या नीट पेपर फुटीप्रकरणात सीबीआयने मोठी कारवाई केली आहे. मागील काही दिवसांपासून सीबीआय नीट पेपरफुटी प्रकरणातील गॉडच्या शोधात होती.

आधीच अटक केलेल्या शिक्षिका मनीषा हवालदार यांच्या फोनमध्ये गॉड या नावाने हा मोबाईल नंबर सेव्ह होता. आता या गॉडला सीबीआयने अटक केली आहे. सीबीआयने डॉ. मनोज शिरुरे आणि तेजस शाह नावाच्या दोन आरोपींना अटक केली आहे. मनोज शिरुरे यांनी शिवराज मोटेगावरकर आणि व्ही व्ही कुलकर्णी यांच्याकडून आपल्या मुलासाठी नीट परिक्षेचा पेपर विकत घेतला होता, असा आरोप करण्यात आला आहे. याआधी शिरुरे यांना सीबीआयने चौकशीसाठी बोलवले होते.

आता अखेर सर्व पुरावे हाती आल्यानंतर डॉ. मनोज शिरुरेला सीबीआयकडून अटक केली आहे. यातील दुसरे नाव म्हणजे तेजस शाह यालाही सीबीआयने अटक केली आहे. तेजस शाह हाच पेपरफुटीतील कथित गॉड असल्याची माहिती मिळाली आहे. नीट पेपरफुटी प्रकरणात अटक करण्यात आलेल्यांची संख्या आता 13 झाली आहे. काही दिवसांपूर्वी सीबीआयने पुण्यातून मनीषा हवालदार नावाच्या मुख्याध्यापिकेला अटक केली होती. तिने फिजिक्स विषयाचे प्रश्न लीक केल्याचा तिच्यावर आरोप करण्यात आला होता.

या प्रकरणी सीबीआयने जेव्हा मनीषा हवालदार यांचा मोबाईल तपासला तेव्हा त्यांच्या फोनमध्ये गॉड नावाने सेव्ह असलेला एक नंबर आढळला होता. शिवाय या क्रमांकाशी मनीषा हवालदार यांनी संशयास्पद संवाद देखील केला होता. पेपरफुटी प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. त्यामुळे हा गॉड नक्की कोण आहे? असा प्रश्न राज्यातील तपास यंत्रणांना पडला होता. याच गॉडच्या शोधात सीबीआय होती. आता अखेर सर्व पुरावे हाती आल्यानंतर सीबीआयकडून पुण्यातून तेजस शाह नावाच्या तरुणाला अटक केली आहे.

याचेच नाव मनीषा हवालदारने गॉड नावाने सेव्ह केले होते. तेजस शाह हा एक विद्यार्थी आहे. त्याचा पेपर फुटी प्रकरणात महत्त्वाची भूमिका असण्याची शक्यता आहे. तेजस शाहच्या चौकशीतून या पेपर फुटी प्रकरणातील अनेक लोक सापडण्याची शक्यता आहे. सीबीआय त्याचा कसून तपास घेत आहे. तेजस शाह नेमका कुणाच्या कनेक्शनमध्ये होता? मनीषा हवालदारशी त्याचे काय संबंध आहेत? या प्रकरणाचा अधिक तपास सीबीआय करत आहे.

विवेक गंगाधरराव राऊत
Author: विवेक गंगाधरराव राऊत

Cheif Editor, Rayat Rakshak News, Maharashtra.

Leave a Comment

अधिक वाचा