कर्नाटक – राज्यात राजकीय उलथापालथ होणार आहे. उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार हे मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे. कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या पदाचा राजीनामा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कर्नाटकाच्या राजकारणात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना राज्यसभेवर पाठवण्याचे आश्वासन काँग्रेस नेतृत्वाने दिल्याची राजकीय चर्चा आहे. तसेच उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांची मुख्यमंत्रिपदी वर्णी लागणार असल्याची सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.
दिल्लीत काल 26 मे 2026 काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यासोबत दिवसभर चर्चा केली आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार दिल्लीत झालेल्या बैठकीला उपस्थित होते. सिद्धरामय्या आणि शिवकुमार हे दोघेही आपल्या समर्थक आमदारांसह दिल्लीत दाखल झाले होते. बैठकीनंतर सिद्धरामय्या यांनी आपल्या जवळच्या मंत्र्यांसोबत स्वतंत्र बैठक घेतल्याने राजकीय चर्चा होत आहे.
राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकांसंदर्भातील चर्चेनंतर सिद्धरामय्या आणि राहुल गांधी यांच्यात अधिक काळ एक स्वतंत्र बैठक झाली आहे. सिद्धरामय्या यांना नेतृत्व बदलाचा मार्ग मोकळा करण्यास सांगण्यात आले आहे. मात्र, यासाठी सिद्धरामय्या यांना यासाठी कोणतीही कालमर्यादा देण्यात आलेली नाही. सिद्धरामय्या यांना राज्यसभेच्या जागेसह अनेक पर्याय देण्यात आले आहेत. परंतु त्यांच्या आणि राहुल गांधी यांच्यातील चर्चेच्या आणखी एका फेरीनंतरच अंतिम निर्णय अपेक्षित आहे.
मात्र, या उच्चस्तरीय पक्ष बैठकीनंतर लगेच, सिद्धरामय्या यांनी आपल्या जवळच्या मंत्र्यांशी चर्चा केली आहे. कर्नाटकात काँग्रेस पुन्हा सत्तेवर येऊन जवळपास 3 वर्षे झाली आहेत. तरी, सिद्धरामय्या आणि शिवकुमार गटांमधील तणाव कायम असताना या बैठका झाल्या आहेत. 2023 मध्ये कर्नाटकमध्ये काँग्रेस पक्षाचे सरकार स्थापन झाल्यापासून, सिद्धरामय्या आणि डी.के. शिवकुमार या दोन्ही नेत्यांमधील तणाव कमी करण्यासाठी काँग्रेस नेतृत्वाने अनेकदा प्रयत्न केला आहे.
शिवकुमार यांच्या समर्थकांनी वारंवार असा दावा केला आहे की, कर्नाटक राज्यात सरकार स्थापनेच्या वेळी आळीपाळीने मुख्यमंत्रिपद देण्यावर सहमती झाली होती, मात्र काँग्रेसच्या हायकमांडने अशा सुचनाला कधीही सार्वजनिकरित्या दुजोरा दिलेला नाही. कर्नाटक राज्यात पुन्हा राजकीय वातावरण बदलाची शक्यता आहे.
Author: विवेक गंगाधरराव राऊत
Cheif Editor, Rayat Rakshak News, Maharashtra.






