केरळमध्ये मोठी कारवाई: माजी मुख्यमंत्री विजयन यांच्या घरी ईडीचे छापे, राजकीय वातावरण तापले

SHARE:

केरळम – राज्यात माजी मुख्यमंत्री पी. विजयन यांच्या निवासस्थानी ईडीने धाड टाकली आहे. आयटी कंपनीशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. केरळचे माजी सीएम पी. विजयन यांच्यावर ईडीची कारवाई झाली आहे. या घटनेत माजी मुख्यमंत्री पी. विजयन समर्थकांनी ईडीच्या पथकावर हल्ला केला आहे. 12 सदस्यीय ईडीच्या पथकाने केरळम मधील बेकरी जंक्शन येथील विजयन यांच्या निवासस्थानी धाड टाकली.

माजी मुख्यमंत्री पी. विजयन यांच्या मुलीच्या एक्झालॉजिक सोल्युशन्स या आयटी कंपनीशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ही धाड टाकण्यात आली आहे. हे प्रकरण कोचीन मिनरल्स अँड रुटाइल लिमिटेड सीएमआरएल द्वारे केलेल्या मनी लाँड्रिंगशी संबंधित आहे. ईडीचा तपास रद्द करण्याची मागणी आयटी कंपनीने केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी, केरळ उच्च न्यायालयाने सीएमआरएलची याचिका फेटाळली आहे. ईडीने या प्रकरणात 2024 मध्ये गुन्हा दाखल केला होता.

सीएमआरएल नावाच्या कंपनीने 2018-19 या काळात विजयन यांची मुलगी टी. वीणा यांच्या एक्झालॉजिक सोल्युशन्स या आयटी कंपनीला 1.72 कोटी रूपये दिले. कोणतेही सॉफ्टवेअर किंवा आयटी सेवा न देता, हे पैसे बनावट खर्च म्हणून देण्यात आले असल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा खुलासा झाल्यानंतर, ईडीने पीएमएलए अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

या आरोपांची चौकशी करण्यासाठी ईडीने 2024 मध्ये पीएमएलए अंतर्गत गुन्हा दाखल केला. हा मुद्दा माजी मुख्यमंत्री विजयन सरकारसमोरील सर्वात राजकीयदृष्ट्या संवेदनशील वादांपैकी एक राहिला आहे. ईडीच्या तपासाव्यतिरिक्त, गंभीर फसवणूक तपास कार्यालय एसएफआयओ या प्रकरणाचा तपास करत आहे.

विवेक गंगाधरराव राऊत
Author: विवेक गंगाधरराव राऊत

Cheif Editor, Rayat Rakshak News, Maharashtra.

Leave a Comment