इंधन दरवाढीचा भडका! बहुजन मुक्ती पार्टीचे देशभरात ‘दे धक्का’ आंदोलन; भाजप सरकारविरोधात रोष

SHARE:

पुणे – बहुजन मुक्ती पार्टीतर्फे इंधन दरवाढीमुळे भाजपा सरकारच्या विरोधात देशभरात दे धक्का आंदोलन करण्यात आले. 31 मे रविवार 2026 रोजी बहुजन मुक्ती पार्टीतर्फे अनेक राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयांवर पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या विरोधात धक्का मारो, सरकार विरोधी जोडे मारो आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात विविध सामाजिक संघटना व बहुजन मुक्ती पार्टी, भारत मुक्ती मोर्चा या संघटनामार्फत सरकार विरोधी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात विविध सामाजिक संघटनांनी आंदोलनासाठी समर्थन दिले होते. भाजपा सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.

इंधन वाढ, गॅसटंचाई या समस्यामुळे सर्वसामान्य नागरिक मोठ्या संकटात सापडले आहेत. या आंदोलनात भाजपा सरकारच्या विरोधी वोट हमारा राज तुम्हारा नही चलेगा, पेट्रोल-डिझेलचा भाव कमी करा नाहीतर खुर्ची खाली करा, ईव्हीएम हटाव देश बचाव, मोदी सरकारचा धिक्कार असो, मोदी सरकारची तानाशाही बंद करो, स्मार्ट मीटर बंद करो, ईव्हीएम मशीन बंद करो, ईव्हीएम मशीनने क्या किया, ईव्हीएम मशीनने देश का सत्यानाश किया, या सांरख्या घोषणा देण्यात आल्या. 665 जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी कार्यालयांवर हे पेट्रोल-डिझेल दरवाढ विरोधी हे धक्का मारो, सरकारविरोधी जोडे मारो आंदोलन करण्यात आले आहे.

आंदोलनात भाजपा सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात, भाजपा सरकारच्या लोकशाही विरोधी नीतीविरोधात निषेध करण्यात आला आहे. भाजपा सरकारच्या चुकीच्या निर्णयांमुळे सर्वसामान्य लोकांना गॅससाठी रांगे उभे राहावे लागत आहे. त्यांनंतर अचानक इंधन वाढ केल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत. गोरगरिब लोकांना वेळेवर गॅस मिळेनासा झाला आहे. अनेक ठिकाणी पेट्रोल-डिझेल वाढीमुळे हाणामारीच्या घटना घडत आहेत. गॅस टंचाईमुळे रोडवर नागरिकांच्या रांगा लागत आहेत, तरी नागरिकांना गॅस मिळत नाही.

तर इंधन दरवाढीमुळे अनेक राज्यात पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेलसाठी नागरिकांच्या लंाब रांगा लागल्या आहेत. सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे सर्वसामान्य लोक त्रस्त झाले आहेत. अनेक सामाजिक संघटनांनी भाजपा सरकारच्या विरोधात संताप व्यक्त केला आहे. भाजपा सरकारचा हुकुमशहाप्रमाणे मनमानी कारभार सुरू आहे.भाजपा सरकार सर्वसामान्य नागरिकांच्या व जनतेच्या विरोधात चुकीचे निर्णय अंमलात आणत आहेत. या चुकीच्या निर्णयामुळे जनतेमध्ये मोठा आक्रोश निर्माण झाला आहे. मागील काही महिन्यापासून गॅसटंचाई, पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण आहेत.

अचानक महागाई वाढल्यामुळे सर्वसामान्य लोकांचे हाल होत आहेत. गॅसटंचाई, पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे नागरिकांचा घरखर्च वाढला आहे. विविध घरगुती वस्तु, किराणा, वाहतुक खर्चात वाढ झाली आहे. आणि भाजपा सरकार आखातातील युध्दाच्या नावाखाली अनेक समस्या निर्माण करत आहेत. या आंदोलनात गॅसटंचाई कमी व्हावी, गॅसचे दर कमी व्हावे, पेट्रोल-डिझेलचे दर कमी व्हावे, अशी मागणी बहुजन मुक्ती पार्टी आणि विविध सामाजिक संघटनांतर्फे करण्यात आली आहे.

विवेक गंगाधरराव राऊत
Author: विवेक गंगाधरराव राऊत

Cheif Editor, Rayat Rakshak News, Maharashtra.

Leave a Comment