नीट पेपरफुटीच्या सावटाखाली स्वप्ने भंगली; तणावामुळे विद्यार्थिनीने संपवले आयुष्य

SHARE:

नागपूर – नीट पेपरफुटी प्रकरणामुळे एका विद्यार्थिनीने मानसिक तणावातून आत्महत्या केल्याची घटना उघड झाली आहे. तर नीट पेपर फुटीप्रकरणाचे देशभरात पडसाद उमटले आहेत. या प्रकरणात पालकांना विद्यार्थिनीने लिहिलेली सुसाईड नोट सापडली आहे. व त्यातून तिच्या आत्महत्येमागील खरे कारण समोर आले आहे. देशभरात नीट पेपरफुटी प्रकरणी मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर आता नीट पेपरफुटीमुळे मानसिक तणावात गेलेल्या विद्यार्थिनीने आपले जीवन संपवले आहे.

मूळची मध्य प्रदेशातील असलेली ही विद्यार्थिनी नागपुरात राहून वैद्यकीय प्रवेशाची तयारी करत होती. तिची परीक्षा देखील खूप चांगली गेली होती. मात्र, एनटीएच्या कारभारामुळे आणि पेपरफुटीमुळे परत एकदा परीक्षा देण्याची वेळ आली. यामुळे ती मुलगी मानसिकदृष्ट्या खचली होती. त्यातूनच तिने हे टोकाचे पाऊल उचलले आहे.

या नीट पेपर फुटीप्रकरणाचे देशभरात पडसाद उमटले आहेत. विद्यार्थिनीने सुसाईट नोटमध्ये म्हटले आहे की, दिवसरात्र एक करून अभ्यास केला होता, मात्र पेपरफुटीचा प्रकार घडला व पूर्णपणे कोलमडली. स्नेहा कृष्ण कुमार असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. ती मूळची मध्य प्रदेशातील मऊगंज जिल्ह्यातील मनगिया गावातील रहिवासी होती. तिचे वडील शेतकरी आहेत. ती लहानपणापासूनच हुशार होती व डॉक्टर बनण्याचे तिचे स्वप्न होते.

ती डॉक्टर बनण्यासाठी मेहनतही घेत होती. तिच्या वडिलांनी कर्ज काढले. व तिला नागपूरला शिक्षणासाठी पाठवले. त्यांनी एका नामांकित कोचिंग क्लासमध्ये तिचा प्रवेश घेतला. तिला त्रास होऊ नये म्हणून ते संपूर्ण कुटुंबासोबत नागपुरातच राहायला आले होते. नागपूरमधील अंबाझरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पांढराबोडी परिसरातील अजयनगर येथे ते राहत होते.

तिने दिवसरात्र एक करून अभ्यास केला. व तिची नीटची परीक्षा देखील चांगली गेली होती. निकालाची प्रतीक्षा करत असतानाच पेपरफुटीचा प्रकार घडला व ती पुरती खचली. तेव्हापासून ती मानसिक तणावात होती. यातूनच 20 मे 2026 रोजी तिने अजयनगर येथील घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती. तिच्या आत्महत्येचे कारण समोर आले आहे. या घटनेचा अधिक तपास नागपूर पोलिस करत आहेत.

विवेक गंगाधरराव राऊत
Author: विवेक गंगाधरराव राऊत

Cheif Editor, Rayat Rakshak News, Maharashtra.

Leave a Comment