पुणे – आळंदी-मरकळ रस्त्यावर अनाधिकृत पार्टीवर पोलिसांनी धाड टाकली आहे. या कारवाईत 107 पुरुष आणि 49 महिलांना अटक केली आहे. पुण्यातील आळंदी मरकळ रस्त्यावरील मध्यरात्री एका हाय-प्रोफाईल पार्टीवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने धाड टाकली आहे. या कारवाईत 85 लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून जप्त करण्यात आला आहे. पुण्यातील आळंदी मरकळ रस्त्यावरील शनिवारी रात्री लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तुळापूर परिसरात ही कडक कारवाई करण्यात आली. या पार्टीला प्रोजेक्ट एक्स असे नाव देण्यात आले होते. या कारवाईत अनेक पुरुष आणि महिला उपस्थित असल्याची माहिती मिळाली आहे.
पोलिसांनी सर्वांना अटक केली आहे. पुण्यात अशा बेकायदेशीर पार्ट्यांचे आयोजन वारंवार केले जात आहे. पुणे क्राईम ब्रँचने शनिवारी रात्री तुळापूर मध्ये एका बंगल्यात मोठ्या प्रमाणावर तरुण-तरुणी एकत्र जमल्याची माहिती मिळाली होती. आणि अंमली पदार्थांचे सेवन केले जात असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. माहिती मिळताच पुणे क्राईम ब्रँचच्या 15 अधिकारी आणि 65 हवालदारांच्या पथकाने एका बंगल्यावर अचानक धाड टाकली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थांचा वापर झाल्याचा संशय आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून नशेसाठी वापरले जाणारे पदार्थ जप्त केले आहे.
तसेच, पार्टीत उपस्थित असलेले काही तरुण-तरुणी पोलिसांना नशेत सापडले आहेत. याशिवाय, राज्य उत्पादन शुल्क विभागाची कोणतीही परवानगी न घेता तिथे विनापरवाना मद्यविक्री सुरू होती, तसेच साऊंड सिस्टिमचा वापर करून धिंगाणा सुरू होता. अशा पार्टीसाठी पोलीस आणि एक्साईज विभागाची रीतसर परवानगी घेणे बंधनकारक असते. मात्र, आयोजकांनी सर्व नियमांचे उल्लंघन करून पार्टीचे आयोजन केले होते. पोलिसांनी जप्त केलेले पदार्थ प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहे. पार्टीमधील तरुण-तरुणी व पार्टीच्या मुख्य आयोजकांची चौकशी सुरू आहे.
या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा समावेश आहे का, आणि हे अंमली पदार्थ कुठून आणले गेले, याचा पोलिस शोध घेत आहे. मात्र, या धक्कादायक प्रकारामुळे पुणे शहर आणि परिसरात पुन्हा एकदा ड्रग्ज आणि बेकायदेशीर पार्ट्यांचा मुद्दा उपस्थित झाला आहे. पुण्यातील लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तुळापूर येथे अनधिकृत पार्टीवरील कारवाईबाबत पोलिसांकडून माहिती देण्यात आली आहे.
15 अधिकारी आणि 65 हवालदारांच्या पथकाने केलेल्या कडक कारवाईत 107 पुरुष आणि 49 महिला सापडल्या आहेत. यापैकी 3 जण अल्पवयीन असल्याचे माहिती मिळाली आहे. पोलिसांनी 3 ग्रॅम गांजा, हुक्का फ्लेवर्स आणि 9.22 लाखांची दारू जप्त केली आहे. या अनाधिकृत पार्टी प्रकरणात यश चौधरी व आयमान शेख हे मुख्य आयोजक असल्याचे उघड झाले आहे. या पार्टीत एकुण 85 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणात अधिक तपास पुणे पोलिस करत आहे.
Author: विवेक गंगाधरराव राऊत
Cheif Editor, Rayat Rakshak News, Maharashtra.






