लाच प्रकरणातील तक्रारदारच अडकला कायद्याच्या कचाट्यात; सुयोग सोळुंकेवर वाळू चोरीसह गंभीर गुन्हे दाखल

SHARE:

जालना – तहसीलदार लाच प्रकरणातील तक्रारदार वाळू तस्कर सुयोग सोळुंकेला अटक करण्यात आली आहे. अवैध वाळू उत्खनन, वाळू चोरी आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सुयोग सोळुंकेवर अवैध वाळू उत्खनन, वाळू चोरी आणि मारहाणीसह विविध गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. यापुर्वीही गुन्हे दाखल होते, तसेच त्याच्यावर एक वर्षासाठी तडीपारीची कारवाईही देखील करण्यात आली होती. बीड आणि जालना जिल्ह्यातील एकाच दिवसात झालेल्या 2 लाचखोरीच्या प्रकरणात महाराष्ट्रातील प्रशासकीय सेवेतील भ्रष्टाचार उघड झाला आहे.

या कारवाईनंतर सोशल मीडियातून तहसीलदारसारख्या उच्च पदस्थ व्यक्तीकडून लाच घेतल्यावरुन संताप व्यक्त करण्यात आला आहे. अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण यांच्या लाच प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. अंबड लाच प्रकरणातील तक्रारदार सुयोग सोळुंके याला जालन्यातील गोंदी पोलिसांनी अटक केली आहे. सुयोग सोळुंके याच्यावर 2025 मध्ये अवैध वाळू चोरीचे दोन गुन्हे दाखल होते, याप्रकरणी त्याला पोलिसांनी अटक कली आहे.

कारण, 2025 मध्ये दाखल गुन्ह्यात त्याला आजपर्यंत अटक का करण्यात आली नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. आरोपी सुयोग सोळुंकेची 2 महिन्यांपूर्वीच जामीनावर सुटका करण्यात आली होती. अवैध वाळू उत्खननासाठी वापरल्या जाणारे पोकलेन मशीन आणि सहा हायवा वाहने सुरू ठेवण्यासाठी सोळुंके याने तहसीलदार विजय चव्हाण यांना 6 लाख 40 हजार रुपयांची लाच दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणात बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून तहसीलदार विजय चव्हाण यांना अटक केली होती.

आता वाळू चोरीच्या गुन्ह्यात सुयोग सोळुंके याला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपी सुयोग सोळुंकेवर यापूर्वी एमपीडीए कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला होता. पोलीस ठाणे गोंदी गु र नं 217/2025, 218/2025, 230/2025 सर्व कलम 303(2),3(5) भा न्या सं सह कलम 3, 4 गौण खनिज (विकास व विनियमन) प्रतिबंध अधिनियमान्वये अटक करण्यात आली होती. याप्रकरणात, त्याची आता जामीनावर सुटका करण्यात आली व परत आरोपी आरोपी सुयोग सोळुंकेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणात अधिक तपास पोलिस करत आहेत.

विवेक गंगाधरराव राऊत
Author: विवेक गंगाधरराव राऊत

Cheif Editor, Rayat Rakshak News, Maharashtra.

Leave a Comment