शाळकरी मुलीवर अत्याचार प्रकरण: तीन जणांवर पोक्सो अंतर्गत कारवाई

SHARE:

धुळे – अल्पवयीन शाळकरी मुलीवर अत्याचार केल्याचा प्रकार उघड झाला आहे. 3 जणांविरोधात पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धुळे जिल्ह्यातून हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शाळकरी मुलीला प्रेमाच्या जाळ्यात फसवणूक करून अत्याचार केला आहे. पीडितेच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत 3 नराधमांनी तिच्यावर वारंवार अत्याचार केले आहेत. हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी पोलिसात धाव घेतली आहे.

धुळे जिल्ह्यातील या धक्कादायक घटनेमुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात 3 तरुणांविरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धुळे जिल्ह्यातील पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नकाणे या गावात राहणाऱ्या आणि 10 वीत शिकत असलेल्या एका अल्पवयीन मुलीला गावातीलच 3 तरुणांनी संगनमत करून आपल्या जाळ्यात अडकवले. या तिघांनीही अल्पवयीन मुलीवर गेल्या 11 महिन्यांपासून हा मानसिक छळ आणि शारिरिक अत्याचार केल्याची माहिती मिळाली आहे.

देवपूर पोलिसांच्या तपासात मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, एका आरोपीने आधी पीडित मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्याशी जवळीक साधली होती. मात्र, काही दिवसांनी त्याचे वर्तन, चुकीच्या सवयी आणि व्यसनाधीनता लक्षात आल्यावर पीडितेने त्याच्यापासून स्वतःला दूर केले होते. या गोष्टीचा राग मनात धरून मुख्य आरोपीने पीडित मुलीला मानसिक आणि शारीरिक त्रास देण्यास सुरुवात केली. यानंतर, याच तरुणाच्या दुसऱ्या एका मित्राने मुलीला समजावण्याच्या बहाण्याने पुन्हा लग्नाचे आमिष दाखवून तिला तिसऱ्या एका तरुणाच्या जाळ्यात अडकवले.

पीडितेच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत या 3 जणांनी तिला देवपूर भागातील एका खासगी ठिकाणी नेले आणि तिथे तिच्यावर वारंवार अत्याचार केले आहेत. पीडित अल्पवयीन मुलीच्या सोबत घडलेला हा संपूर्ण प्रकार जेव्हा तिच्या कुटुंबीयांना समजला, तेव्हा त्यांनी पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात 3 आरोपीविरोधात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य आणि संवेदनशीलता ओळखून 3 आरोपींविरुद्ध पॉस्को कायद्यासह विविध कलमांन्वये गंभीर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास धुळे पोलिस करत आहे.

विवेक गंगाधरराव राऊत
Author: विवेक गंगाधरराव राऊत

Cheif Editor, Rayat Rakshak News, Maharashtra.

Leave a Comment