गुन्हे शाखा पोलिसांकडून सोनसाखळी चोराला अटक; आरोपीकडून 15 लाखांचे दागिने व 2 स्पोर्ट बाईक जप्त

SHARE:

पुणे – गुन्हे शाखा पोलिसांकडून सोनसाखळी चोराला अटक करण्यात आली आहे. तर आरोपीकडून 15 लाखांचे दागिने व 2 स्पोर्ट बाईक जप्त करण्यात आल्या आहेत. पुण्यातील पोलिस पथकाने घटनास्थळापासून ते महामार्गापर्यंतच्या 200 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले आहे. तपासात समोर आले की, हा सोनसाखळी चोर गुन्हे करण्यासाठी बंगळूरू हायवेचा वापर करत होता. पुणे शहरात क्राईम पेट्रोलमधून काही लोक गुन्हेगारी शिकत असल्याचा एक धक्कादायक प्रकार पुण्यात समोर आला आहे.

क्राईम पेट्रोल पाहून पुण्यात गंभीर गुन्हे करणाऱ्या आरोपी सुमित इंगळेला पोलिसांनी पक़डले आहे. मालिका पाहून सोनसाखळी हिसकावण्याचे तंत्र शिकलेल्या एका चोराला पुणे- पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने पाठलाग करून अटक केली आहे. गुन्हे शाखेने अटक केलेल्या या चोराचे नाव सुमित गोविंद इंगळे सध्या रा. मामुर्डी, मूळ बार्शी, जि. सोलापूर असे आहे. आरोपी सुमित इंगळे हा अत्यंत वेगवान स्पोर्ट बाईकचा वापर करून महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावून पळून जायचा.

पुणे पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्याकडून 15 लाख रुपये किमतीचे 76 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेल्या दोन महागड्या स्पोर्ट बाईक जप्त केल्या आहेत. 3 जून 2026 रोजी पिंपळे निलख येथील सुदर्शन पॅराडाइज सोसायटीसमोर एका नागरिकाच्या गळ्यातील 2 तोळ्यांची सोन्याची चेन ओरबाडून चोर पळून गेला होता. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या आदेशानुसार गुन्हे शाखेने तपासाची केला.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने घटनास्थळापासून ते महामार्गापर्यंतच्या 200 सीसीटीव्ही कॅमेऱा फुटेज तपासले. 7 जून 2026 रोजी बाणेर परिसरात पोलिसांना आरोपी सुमित इंगळे संशयास्पद फिरताना दिसला. पोलिसांची चाहूल लागताच त्याने स्पोर्ट बाईकवरून पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र पथकाने पाठलाग करून त्याला पकडले. पोलिसांनी चौकशी करताच आरोपी सुमित इंगळेने तो क्राईम पेट्रोल पाहून चोरी केल्याची कबुली दिली.

त्याच्या अटकेमुळे पुण्यातील 5 मोठे गुन्हे उघडकीस आले आहेत. पुणे शहरातील सांगवी, दापोडी, तळेगाव, वाकड, वाघोली आणि भारती विद्यापीठ परिसरात त्याने मोठी चोरी केल्याचे समोर आले आहे. न्यायालयाने कोठडी सुनावली आहे. पुणे गुन्हे शाखेचे पोलीस त्याची अधिक चौकशी करत आहेत. याप्रकरणात अधिक तपास पुणे पोलिस करत आहेत.

विवेक गंगाधरराव राऊत
Author: विवेक गंगाधरराव राऊत

Cheif Editor, Rayat Rakshak News, Maharashtra.

Leave a Comment