माणूस…..

SHARE:

माणूस… या विषयावर त्याच्या जीवनशैलीवर प्रकाश टाकणारा साहित्यिक व कवी श्री. संजय अण्णाजी देशमुख यांचा लेख प्रकाशित करत आहोत…

 

मनातील डोक्यात अन् डोक्यातल लोकांत यायला वेळ लागत नाही म्हणून म्हटले आहे शुद्ध बिजापोटी फळ रसाळ गोमटी.
म्हणून मन स्वच्छ आणि निर्मळ असावं.

जे पेरांल तेच उगवेल आपल्या मनामध्ये जे विचार असतात ते डोक्यात येऊन जग आपल्याला तसेच भासू लागते. आपले मन सदैव चिकित्सक, मानवतावादी, उच्च ध्येयवादी असल्यास त्याचे परिणाम चांगलेच दिसून येतात परंतू तेच लोभी, स्वार्थी कपटी असल्यास माणसाच्या सुखात, आनंदात त्याचा विपरीत परिणाम होतो आणि आपण दोष नशिबाला आणि देवाला देत बसतो. आज सर्वांनाच सुख समाधान पाहिजे परंतू त्याचा मार्गच माहित नसल्यामुळे बर्‍याच माणसाची ही इच्छा पुर्ण होऊ शकत नाही.

माणसांनी स्वतःचा अहं अभिमान सोडून लवचिकता आणि तडजोड धोरण स्विकारले तर माणसाला सुख आणि समाधानाची वाट नक्कीच सापडू शकते. पण त्यासाठी माणसाला कधी लहान तर कधी मोठं व्हावं लागते. हे जग आज काया आणि माया यांच्या मागे धावणारे आहे जे दोन्ही टिकाऊ नाही. केव्हा हे सोडून जातील त्यांचा भरवसा नाही या गोष्टी माणसांच्या खूप उशिरा लक्षात येते तेव्हा वेळ निघून गेलेली असते. काया मायेच्या मोहात माणूस कसा भरकटतो हे लक्षातच येत नाही. आपण या लोभापायी अनावधानाने आपल्याकडून काय चुका होतात ते सुद्धा कळत नाही. आणि भविष्यात याच चुकांचे परिणाम मिळायला सुरुवात होते तेव्हा सहन करायची ताकद सुद्धा आपल्यात रहात नाही तेव्हा मन मारून जगावं लागतं आणि आपलं दुःख आपण कुणाला सांगुनी शकत नाही कारण आपला इतिहास हा सांगण्या सारखा गौरवशाली नसतो कारण आपल्या कर्तृत्वाचा हिशोब जनतेच्या पहिलेच डोक्यात बसलेला असतो.

माणसाच्या जन्मी माणूस आल्यास त्यांनी माणसासारखे वागले तर त्याचे नाव सदैव भला माणूस म्हणून सदैव चर्चेत राहते. जगतो हा प्रत्येकच पण कसा जगतो याला जास्त महत्त्व आहे.

 

लेखक –
संजय अण्णाजी देशमुख
मु. पळसखेड, जि. अमरावती.
संपर्क – ९४२१७८९००९

संजय अण्णाजी देशमुख
Author: संजय अण्णाजी देशमुख

लेखक एक उत्कृष्ट शिक्षक, साहित्यिक, मार्गदर्शक, कवी, अभंगकार, पोवाडे रचियेता, सर्वोत्कृष्ट काव्य रचनेचे राज्य स्पर्धा पुरस्कर्ते आहेत. 'चरे अंतरीचे' हा त्यांचा काव्यसंग्रह २०२३ ला प्रकाशित झालेला असून पुढील दोन काव्य संग्रह लवकरच प्रकाशित होत आहे. तसेच राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक विषयावरील ज्वलंत सडेतोड विचार मांडणारेउत्कृष्ट लेखक आहेत. विविध सामाजिक संघटनेच्या माध्यमातून सुद्धा ते सामाजिक क्षेत्रात अग्रेसर आहेत. सा. रयत रक्षक, महाराष्ट्र व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र च्या माध्यमातून साहित्य व वैचारिक लेख, काव्यरचना च्या माध्यमातून सतत आपले विचार जनतेपुढे मांडत असतात..

Leave a Comment