दिव्या भगत-पारधी दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर मंडळाच्या DRUCC सदस्या नियुक्त; गोंदियासह संपूर्ण रेल्वे प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण

SHARE:

गोंदिया : रेल्वे प्रवाशांच्या सोयी-सुविढा, सुरक्षा तसेच रेल्वेच्या पायाभूत संरचनेसंदर्भातील विकासासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या (SECR) नागपूर रेल्वे मंडळ अंतर्गत ‘मंडळ रेल उपयोगकर्ता परामर्शदात्री समिती’ (DRUCC) च्या अधिकृत सदस्यपदी गोंदियाच्या श्रीमती दिव्या भगत-पारधी यांची अधिकृत सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

रेल्वे मंत्रालयाच्या नियमावलीनुसार आणि विशेष कोट्यांतर्गत, वरिष्ठ जनप्रतीनिधी व उच्चाधिकाऱ्यांच्या भक्कम शिफारसीनंतर रेल्वे प्रशासनाकडून ही अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या महत्त्वपूर्ण नियुक्तीमुळे गोंदिया जिल्ह्यासह संपूर्ण नागपूर रेल्वे मंडळात प्रवाशांच्या विकासाला अधिक गती मिळणार असून सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे.

कार्यक्षेत्र व व्याप्ती विस्तार

रेल्वे प्रशासनाकडून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, श्रीमती दिव्या भगत-पारधी यांचे कार्यक्षेत्र केवळ एका रेल्वे स्टेशनपुरते किंवा जिल्ह्यापुरते मर्यादित राहणार नाही. नागपूर रेल्वे मंडळांतर्गत येणाऱ्या सर्व भौगोलिक क्षेत्रांतील स्टेशन्स, प्रवासी विभाग तसेच विविध प्रशासकीय विभागांसाठी त्यांचे कार्य व्यापक स्वरूपात लागू असणार आहे. प्रवाशांच्या समस्या सोडवणे, त्यांना उत्तम दर्जाच्या सुविधा मिळवून देणे आणि रेल्वेच्या कारशेडमधे सुधारणा करणे यासाठी त्या सक्रिय भूमिका बजावणार आहेत.

८ वर्षांचा लाम दुरदृष्टीचा आणि जमिनीवरील अनुभव ठरला फायदेशीर

या नियुक्तीमागे श्रीमती दिव्या भगत-पारधी यांचा दीर्घ, बहुआयामी आणि संघटनाविरहित सामाजिक व प्रशासकीय अनुभव अत्यंत मोलाचा ठरला आहे. त्या मागील ८ वर्षांपासून स्थानिक ‘स्टेशन सलाहकार समिती’ (SSC) आणि नगर समितीच्या माध्यमातून जमिनी स्तरावर अत्यंत सक्रियपणे कार्यरत राहिल्या आहेत. स्थानिक रेल्वे विकास, नागरिक सुविधा तसेच प्रवासी हितांशी संबंधित संवेदनशील प्रश्नांचा आणि जमिनी वास्तवाचा त्यांना जवळून अनुभव आहे. त्यांच्या याच दिर्घकालीन व उत्तम अनुभवाची दखल घेऊन रेल्वे प्रशासनाने त्यांना ही मोठी आणि जबाबदारीची धुरा सोपवली आहे.

जनप्रतिनिधी, व्यावसायिक संघटना व नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव

श्रीमती दिव्या भगत-पारधी यांच्या या प्रतिष्ठेच्या आणि व्यापक नियुक्तीवर गोंदिया जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ जनप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, विविध व्यापारी व व्यावसायिक संघटना, सामाजिक कार्यकर्ते तसेच राजकीय क्षेत्रातील प्रमुख व्यक्तींनी तीव्र हर्ष व्यक्त केला आहे. सर्वांनी त्यांना उज्ज्वल व यशस्वी कार्यकालसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.

क्षेत्रातील सुजाण नागरिकांनी आणि प्रवाशांनी असा विश्वास व्यक्त केला आहे की, दिव्या यांच्या या दिर्घकालीन अनुभवाचा फायदा गोंदियासह संपूर्ण नागपूर रेल्वे मंडळातील प्रवाशांना होईल आणि येथील रेल्वे विकासाच्या कामांना आणखी गती प्राप्त होईल.

विवेक गंगाधरराव राऊत
Author: विवेक गंगाधरराव राऊत

लेखक सा. रयत रक्षक व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र. चे मुख्य संपादक असून स्वतः प्रकाशक व मालक आहेत. त्यांना मागील 20 वर्षांपासून सामाजिक व राजकीय क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव व पत्रकारिता क्षेत्रातील मागील 9 वर्षाचा अनुभव आहे. आपल्या लेखणीतून ते नेहमी रयतेचे हित जोपसण्याचे कार्य करतात.

Leave a Comment

अधिक वाचा