नोव्हेंबरचा शेवटचा दिवस, रविवार दिनांक ३० नोव्हेंबर २०२५ . १२ राशींचे आजचे राशीभविष्य वाचा..

SHARE:

राशींभविष्य – वैदिक पंचांगानुसार, आज ३०  नोव्हेंबर २०२५ , आजचा वार रविवार आहे. हा दिवस ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने खास आहे. आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व १२  राशींच्या लोकांवर दिसून येईल. श्रीखंडोबाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? १२ राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

मेष रास (Aries)
मेष राशीच्या लोकांनो आज महिलांना उत्कृष्ट कामाची ओढ आतूनच निर्माण होईल, कुटुंब वत्सल राहाल.

वृषभ रास (Taurus)
वृषभ राशीच्या लोकांनो आज प्रकृतीच्या तक्रारी वारंवार जाणवतील, खांदेदुखी, गुडघेदुखी यावर औषध घ्यावे लागेल.

मिथुन रास (Gemini)
मिथुन राशीच्या लोकांनो आज कोणत्याही प्रकारचा मानसिक त्रास करून घेऊ नये, व्यवसायात आधी काम सुरू करा, मग त्यात सुधारणा करता येईल.

कर्क रास (Cancer)
कर्क राशीच्या लोकांनो आज प्रत्येक गोष्टी भावनांच्या निकषावर घासून चालत नाहीत, याचा प्रत्यय येईल. काही बाबतीत व्यवहारही बघावा लागेल, आजूबाजूच्या जगात व्यवहारांमध्ये चौकसपणा ठेवला तर फायद्याचे ठरेल.

सिंह रास (Leo)
सिंह राशीच्या लोकांनो आज घरात आणि घराबाहेर प्रवाहाच्या विरुद्ध वागण्याचे विचार मनात येतील आणि ते अंमलातही आणाल.

कन्या रास (Virgo)
कन्या राशीच्या लोकांनो आज विद्यार्थी संशोधन क्षेत्रात चमकतील, आपले छंद गुप्तपणे जोपासण्याकडे कल राहील.

तूळ रास (Libra)
तूळ राशीच्या लोकांनो आज नवीन नोकरीमध्ये थोडी दोलायमान परिस्थिती निर्माण होऊ शकते, प्रकृती चांगली राहिली तरी डोक्यावर ताण येईल.

वृश्चिक रास (Scorpio)
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज नोकरी व्यवसायात उत्कर्षाच्या संधी येतील, मनापमानाच्या बाबतीत टोकाचे निर्णय घेतले जातील.

धनु रास (Sagittarius)
धनु राशीच्या लोकांनो आज बुद्धीचा वापर जगावेगळ्या गोष्टी करण्याकडे राहील, घरात तातडीची कामे निघतील.

मकर रास (Capricorn)
मकर राशीच्या लोकांनो आज एखाद्या गोष्टीतील निष्काळजीपणा थोडा महागात पडेल, जवळच्या लोकांच्या बाबतीतील हट्टीपणा दुःखाला कारणीभूत होऊ शकतो.

कुंभ रास (Aquarius)
कुंभ राशीच्या लोकांनो आज प्रचंड मेहनतीच्या मानाने पूर्ण यश मिळत नसल्यामुळे थोडे निराशेकडे झुकाल.

मीन रास (Pisces)
मीन राशीच्या लोकांनो आज नोकरी व्यवसायात वाढ करावी किंवा त्याला पूरक असा दुसरा व्यवसाय करावा का काय असा विचार मनात येईल.

Leave a Comment

अधिक वाचा