घरबसल्या ओटीटीवर काही तरी नवीन पाहायला विचार करताय? या आठवड्यात रिलीज होतायत या हटके वेब सीरिज…

SHARE:

मनोरंजन विश्व् – सध्या प्रेक्षक ‘ बे दुणे तीन ‘चा ट्रेलर एन्जॉय करत आहेत. कारण आजच्या जोडप्यांच्या जवळची गोष्ट त्यातून मांडली जात आहे. नव्या पाहुण्याच्या आगमनाची बातमी ऐकून घर आनंदून जातं, पण त्या जोडप्याच्या मनात अनेक उलाढाली सुरू असतात. प्रश्नांचं काहूर माजलेलं असतं. तशीच काहीशी अवस्था सीरिजमधल्या अभय आणि नेहा या जोडप्याची झालेली असते. त्यांना आनंदाची बातमी कळते खरी, पण त्यांच्या घरी एक नव्हे, दोन नव्हे तर तीन-तीन पाहुण्यांचं आगमन होणार असतं. यात क्षितिश दाते, शिवानी रांगोळे आणि पुष्कराज चिरपुटकर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत तर दीक्षा केतकर, विराजस कुलकर्णी आणि शुभांकर एकबोटे हे अनोख्या भूमिकेमध्ये दिसणार आहेत. प्रत्येक कथेमध्ये जसा द्विस्ट येतो तसा त्यांच्या आयुष्यातही येतो. ते वळण काय? हे जाणून घेण्यासाठी ही सीरिज ५ डिसेंबरला मराठी झी फाइव्हवर पाहायला हवी.

नवा कोर्टरूम ड्रामा

‘अचिंता ट्रायल बाय लॉ’ या सीरिजच्या दुसऱ्या सीझनमध्ये नुपूर नावाच्या एका तरुण मुलीच्या वडिलांवर एका किशोरवयीन मुलीचा बलात्कार करून खून केल्याच्या आरोप लावला जातो. या केससाठी ती अचिंताची मदत मागते. ही केस अचिंता स्वीकारतो. पण यामुळे त्याला सामान्यांचा रोष, धमक्या याचा सामना करावा लागतो. ही केस सोडवण्यात अचिंता यशस्वी होतो का? हे पाहण्यासारखं असेल. ‘अचिंता-ट्रायल बाय लॉ २’ ही सीरिज ४ डिसेंबरला ॲमेझॉन एमएक्स प्लेअरवर प्रदर्शित होत आहे.

कॅम्पसमधली गोष्ट

आगामी कॅम्पस ड्रामा ‘ औकात के बाहर ‘ या सीरिजमध्ये एल्विश यादव याला प्रमुख भूमिकेत पाहून त्याचे चाहते खुश झाले आहेत. त्याच्यासह मल्हार राठोड, हेतल गाडा, निखील विजय आणि केशव साधना हे कलाकारसुद्धा महत्त्वपूर्ण भूमिकांमधून आपल्या भेटीला येत आहेत. यामध्ये प्रेक्षकांना कॅम्पसमधली मैत्री-दुश्मनी, फुलणारा रोमान्स असं सगळं काही पाहायला मिळणार आहे. ही सीरिज ३ डिसेंबरला ॲमेझॉन एमएक्स प्लेअरवर पाहता येईल.

सत्यघटनेवर आधारित

२००६ झाली घडलेल्या निठारी हत्याकांडानं संपूर्ण देश हादरला होता. याच घटनेवर बेतलेली ‘निठारी टूथ, लाइज अँड मर्डर’ ही डॉक्यु सीरिज प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. या सीरिजची घटना सादर करण्याची पद्धत आवडली असल्याचं प्रेक्षक सांगतात. ही सीरिज ॲमेझॉन प्राइम व्हिडीओवर उपलब्ध आहे.

Leave a Comment

अधिक वाचा