
राशींभविष्य – वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज १ डिसेंबर २०२५ चा दिवस आहे. आजपासून डिसेंबर महिन्याला सुरुवात झाली आहे. तसेच, आजचा वार सोमवार आहे. हा दिवस आपण भगवान शंकराला समर्पित करतो. आजच्या दिवशी भक्त महादेवाच्या मंदिरात जाऊन पूजा करतात. तसेच इच्छित फळ मागतात. भगवान शंकरासाठी आजच्या दिवशी उपवास देखील केला जातो. ग्रहांच्या हालचालीच्या दृष्टीने देखील आजचा दिवस खास असणार आहे. त्यामुळे ग्रहांच्या संक्रमणाचा कोणकोणत्या राशींवर परिणाम होणार आणि १२ राशींसाठी आजचा दिवस नेमका कसा असणार आहे. यासाठी वाचूयात सर्व १२ राशींचं आजचं राशीभविष्य…
मेष रास (Aries)
मेष राशीसाठी आजचा दिवस लाभदायक ठरणार आहे. आज डिसेंबर महिन्याचा पहिलाच दिवस असल्या कारणाने एखाद्या नवीन कार्याची तुम्ही सुरुवात करु शकता. तसेच, जर एखादी वाईट सवय असेल तर ती मोडून स्वत:मध्ये चांगला बदल घडवून आणू शकता.
वृषभ रास (Taurus)
वृषभ राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. तुमच्यामध्ये आत्मविश्वास दिसून येईल. ग्रहांची स्थिती शुभ असल्या कारणाने तुमच्यामध्ये सकारात्मक परिणाम दिसून येईल. समाजात तुम्हाला चांगला मान-सन्मान मिळेल.
मिथुन रास (Gemini)
मिथुन राशीसाठी आजचा दिवस आव्हानात्मक असणार आहे. या काळात कोणतीही नवीन जोखीम हातात घेऊ नका. तसेच, तुमच्या अपेक्षेप्रमाणे तुम्हाला गोष्टी करता येणार नाहीत. त्यामुळे पैशांची गुंतवणूक करु नका.
कर्क रास (Cancer)
कर्क राशीसाठी आजचा दिवस खास असणार आहे. तुमच्यातील नातेसंबंध अधिक मजबूत झालेले दिसतील. कामाच्या बाबतीत तुम्ही प्रामाणिक असाल. इतरांप्रती तुम्ही फार संवेदनशील असाल. आज तुमच्या मेहनतीला चांगलं यश मिळेल.
सिंह रास (Leo)
सिंह राशीने कोणत्याही गोष्टीत संतुलन ठेवणं गरजेचं आहे. या काळात तुमच्यातील कलागुणांना चांगला वाव मिळेल. समाजात तुम्हाला चांगला मान-सन्मान मिळेल. तसेच, नातेसंबंध अधिक मजबूत झालेले दिसतील. मित्रांचा सहवास तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरेल.
कन्या रास (Virgo)
कन्या राशीसाठी आजचा दिवस आव्हानात्मक असणार आहे. तुम्ही भावनांवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. तसेच, इतरांच्या मध्यात पडू नका. आजच्या दिवशी कोणताही निर्णय घेताना विचारपूर्वक निर्णय घ्या. धैर्य आणि संयम कायम ठेवा.
तूळ रास (Libra)
तूळ राशीसाठी आजचा दिवस भाग्यशाली असणार आहे. सामाजिक क्षेत्रात विकास झालेला दिसेल. तसेच, तुमच्यातील नातेसंबंध अधिक मजबूत झालेले दिसतील. वैवाहिक जीवन सुरळीत चालेल. तसेच, बुद्धिमानी लोकांच्या संपर्कात तुम्ही याल.
वृश्चिक रास (Scorpio)
वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस खास असणार आहे. समाजातील विभिन्न लोकांशी तुमच्या गाठीभेटी होतील. तुमच्यातील नातेसंबंध अधिक मजबूत दिसतील. तुमच्या मेहनतीला चांगलं यश मिळेल. कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो.
धनु रास (Saggitarius)
धनु राशीसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. तुमच्यातील धैर्य आणि सहनशीलता आबाधित ठेवा. तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. हातात घेतलेली कामे वेळेत पूर्ण करता येतील. तुमच्यातील आत्मविश्वास वाढलेला दिसेल.
मकर रास (Capricorn)
मकर राशीसाठी आजचा दिवस आव्हानात्मक असणार आहे. जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना चांगली नोकरी मिळू शकते. या काळात तुम्हाला आत्मपरीक्षणाची गरज आहे. नात्यात अधिक दृढता टिकून राहील. तसेच, प्रवासाचे योग जुळून येतील.
कुंभ रास (Aquarius)
कुंभ राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. तुमच्यातील नातेसंबंध अधिक घट्ट होताना दिसतील. नोकरीत प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. तसेच, सकारात्मक लोकांच्या संपर्कात तुम्ही याल. नवीन लोकांशी भेटीगाठी होतील.
मीन रास (Pisces)
मीन राशीसाठी आजचा दिवस खास असणार आहे. कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. नवीन लोकांच्या संपर्कात तुम्ही याल. तसेच, तुमच्यातील निर्णय घेण्याची क्षमता चांगली दिसून येईल. तुमच्यासाठी हा काळ फार सकारात्मक असणार आहे.
(टीप : वरील सर्व बाबी रयत रक्षक न्यूज केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून रयत रक्षक न्यूज कोणताही दावा करत नाही.)





