
पुणे – पुणे जमीन प्रकरणात, ९९ टक्के भागीदार पार्थ पवार यांच्यावर कारवाई का होत नाही?असा प्रश्न राज्यातील भाजपा सरकारला शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी विचारला आहे. पुणे जमीन घोटाळा प्रकरणातील आरोपींच्या सोयीने चौकशी केली जात आहे, असे चित्र सध्या राज्यात दिसत आहे. ९९ टक्के भागीदार असलेल्या पार्थप पवार या पार्टनरवर गुन्हा दाखल होत नाही, पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी अंबादास दानवेंचा संताप व्यक्त केला आहे. पुण्यातील जमीन घोटाळा प्रकरणात 99 टक्के मालकी ही पार्थ पवारांकडे असूनही त्यांच्यावर कारवाई होत नसल्याने, त्यांचे नाव कुठेही येत नसल्याने,राज्यातील विरोधी पक्षांनी व अजित पवारांसह राज्यातील भाजपा सरकारवर जोरदार टीका केली आहे.
पुण्ण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपूत्र पार्थ पवार यांच्यावरती कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. अमेडिया कंपनीमध्ये ९९ टक्के मालकी ही पार्थ पवारांची आहे तर १ टक्का भागीदार असलेले दिग्विजय पाटील यांच्यावरती कारवाई करण्यात येत असून आज त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. तर ९९ टक्के मालकी ही पार्थ पवारांकडे असूनही त्यांच्यावर कारवाई होत होत नाही. पार्थ पवार यांना वाचवण्याचा भाजपा सरकार प्रयत्न करत आहे. विरोधकांनी पवारांसह सरकारवर हल्लाबोल केला आहे. अशातच शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी भाजपा सरकारच्या विरोधात पोस्ट लिहून ,याबाबत संताप व्यक्त केला आहे.
अंबादास दानवेंनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, “पुण्यातील जमीन प्रकरण हे बहुदा पहिलेच असे प्रकरण मी पाहिले ज्यात ’आरोपींच्या सोयीने चौकशी सुरू आहे. पत्र-पत्र खेळण्याची कारणे आजही संपतील, याची शक्यता शून्य वाटते. न्यायालयाने ऐकवल्यावरही ९९ टक्के भागीदार असलेल्या पार्टनर पार्थ पवारवर गुन्हा दाखल होत नाही. राज्यातील भाजपा सरकार कोर्टाच्या आदेशाची वाट पाहत आहे काय? असा प्रश्नही अंबादास दानवे यांनी उपस्थित केला आहे.
पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी अमेडिया कंपनीचे भागीदार असलेले दिग्विजय पाटील आजतरी चौकशीला हजर राहणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण यापूर्वी पुणे पोलिसांनी त्यांना ३ वेळा चौकशीसाठी बोलवले होते. त्या तिन्ही वेळा त्यांनी पुणे पोलिसांना वेगवेगळी कारणे देऊन चौकशी पुढे ढकलली आहे. अजित पवारांचे पुत्र जय पवार यांच्या लग्नाचे कारण आणि त्यानंतर प्रकृतीचे कारण देऊन शनिवारी देखील ते चौकशीला गैरहजर राहिले आहेत.
आज ते चौकशीला हजर राहणार असल्याची माहिती आहे. मात्र आज कोणते नवीन कारण शोधून दिग्विजय पाटील चौकशीला गैरहजर राहतील, की थेट चौकशीला सामोरे जातील, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणातील जागा ही पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील यांच्या अमेडिया कंपनीला पॉवर ऑफ अॅटॉर्नी करुन देण्यात आली होती. त्यात दिग्विजय पाटील भागीदार असल्याने त्यांची पोलिसांकडून कसून चौकशी केली जाणार आहे. याच प्रकरणात पॉवर ऑफ ॲटॉर्नी केलेली शितल तेजवानी सध्या पुणे पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्यांची पोलीस कोठडी संपणार असून, त्यांना पुणे पोलिसांकडून कोर्टात हजर करण्यात येणार आहे.
राज्यातील अधिकारी लोकांनी वेळेवर कारवाई केली असती तर, आरोपी मोकाट फिरले नसते. मुंढवा जमीन प्रकरणी व्यवहार होत असताना, अधिकाऱी लोकांनी कागदपत्र पडताळणी करणे आणि चुकीच्या बाबी असल्याचे लक्षात आल्यानंतर, भूमिका घेणे अपेक्षित होते. अधिकाऱी वर्गानी लवकर कारवाई केली असती तर पुढील प्रकार घडला नसता, असे अजित पवार म्हणत आहे. त्यामुळे पुण्यातील जमीन व्यवहार प्रकरणात अजित पवार हे अधिकारी वर्गाला दोष देत आहे, खरे कारण तर अजित पवारांचा मूलगा आहे.
या पुणे जमीन घोटाळा प्रकरणात अजित पवारांचा मूलगा पार्थ पवार ९९ टक्के भागीदार आहे. तरी राज्यातील भाजपा सरकार त्यांचे नाव कोठेही येऊ देत नाही. याचा अर्थ असा होत आहे की, राज्यातील भाजपा सरकार आणि पुणे पोलिस अजित पवारांचा मूलगा पार्थ पवार हा आरोपी असताना त्याला वाचवण्याचा वारंवर प्रयत्न करत आहे, असेच चित्र सध्या पुणे जमीन प्रकरणात दिसत आहे. राजकीय लोकांच्या मूलांवर का कारवाई होत नाही? हाही प्रश्न इथे उपस्थित झाला आहे. व या पुणे प्रकरणात मुख्य सुत्रधार आरोपी सोडून पुणे पोलिस तपास करत आहेत, चौकशी करत आहे, आणि 99 टक्के भागीदार असलेला पार्थ पवार याला वाचवण्याचा पोलिस भाजपा सरकार ही प्रयत्न करत आहे, असे अंबादास दानवे म्हणाले आहेत.





