
नवी दिल्ली – देशभरात कफ सिरप रॅकेट व अवैध तस्करी प्रकरणात, तीन राज्यांमध्ये २५ ठिकाणी ईडीची धाड टाकण्यात आली आहे. देशातील कफ सिरप रॅकेट व अवैध तस्करी प्रकरणात, झारखंड, उत्तरप्रदेश, गुजरात या तीनही राज्यांमध्ये २५ ठिकाणी ईडीने मोठी धाड टाकली आहे. देशातील कफ सिरप रॅकेटमध्ये खळबळजनक खुलासा
करण्यात आला आहे. देशभरात ७०० कंपन्या फक्त दाखवल्या आहेत, तर या कफ सिरप रॅकेट व अवैध तस्करी प्रकरणात आरोपींनी अब्जावधींची कमाई केली आहे, असा ईडीने दावा केला आहे.
देशभरात सक्तवसुली संचालनालयाने टाकलेल्या छाप्यात कफ सिरप रॅकेट आणि अवैध तस्करी प्रकरणी मोठा पर्दाफाश झाला आहे. ४० तासांपेक्षा अधिक तास देशभरात ईडीने छापा टाकला आहे. यानंतर मिळालेल्या पुराव्यांनुसार 220 संचालकांच्या नावाने ७०० पेक्षा अधिक कंपन्या बनवण्यात आल्या आहेत. या ७०० कंपन्यांच्या माध्यमातून अब्जावधी रुपयांची कमाई करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे यातील भारत देशातील बहुतांश कंपन्या फक्त कागदावरच आहेत.
देशातील ईडीच्या अधिकाऱी लोकांनाही कंपनीच्या कागदपत्रांची तपासणी करताना आश्चर्याचे धक्के बसले आहेत. बहुतांश कंपनीत अनेक कर्मचारीही फक्त कागदावरच होते. ईडीच्या सूत्रांनी दावा केला आहे की, अजूनही देशभरातील अनेक कंपन्यांबाबत पुरावे गोळा केले जात आहेत. ईडीसमोर आलेल्या पुराव्यांच्या आधारे लवकरच या ७०० कंपन्यांची संपत्ती जप्त करण्याची कारवाई सुरू केली जाणार आहे, असे ईडीने म्हटले आहे.
उत्तर प्रदेश, गुजरात आणि झारखंडमधील २५ ठिकाणांवर ईडीने छापा टाकला आहे. यात समोर आलेल्या माहितीमुळे ईडीचे कर्मचारीही चक्रावले आहेत. ईडीने युपीत अशा पद्धतीची फसवणूक पहिल्यांदाच समोर आल्याचे म्हटले आहे. फेंसेडिल सिरप बनवत असलेल्या एका कंपनीच्या अनेक अधिकरी व कर्मचारी यांना याबाबत माहिती होते, पण त्यांनी मौन बाळगले होते. एसटीएफच्या एएसपी लाल प्रताप सिंह यांनी सांगितले की, कंपनीतील अनेक अधिकारीही व कर्मचारीही या प्रकरणात चौकशीत सापडणार आहेत.
एसटीएफची चौकशी झाल्यानंतरही शुभम जयस्वाल, माजी खासदाराचे निकटवर्तीय अलोक सिंह, अमित टाटा यांनी स्वतःला वाचवण्यासाठी वेगवेगळया कल्पना लढवायला सुरुवात केली आहे. अमित आणि अलोक यांना अटक केल्यानंतरही यांना काही अडचण झाली नाही. कोर्टात हे आरोपी निश्चिंत होते. जेव्हा ईडीने अमित, शुभम, अलोक यांच्या ठिकाणांवर छापे टाकायला सुरुवात केली तेव्हा मात्र घाबरले आहेत.
दुबईत या घोटाळयाचा सूत्रधार शुभम जयस्वाल लपून बसला आहे. तर अलोक सिंह, अमित टाटा यांच्याशिवाय शुभमचा वडील भोला प्रसादच्या खात्यावरही व्यवहार दिसून आले आहेत. यातील अनेक व्यवहारांची पूर्ण माहिती मिळालेली नाही. कंपन्यांच्या नावाने उघडलेल्या खात्यांवरही असे व्यवहार आहेत, ज्याची पुढची माहिती नाही. आणखी काही खोट्या कंपन्यांची नावे समोर येण्याची शक्यता आहे. जीएसटी विभागाकडून या कंपन्यांबाबत यादी मिळणार आहे. यामुळे तपासाची व्याप्ती वाढणार आहे. देशभरात कफ सिरप रॅकेट आणि अवैध तस्करी प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे.





